दिल्ली (Delhi) पोलिसांनी ‘आप’ प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांच्यासह इतर नेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. द्वारका परिसरात मोठ्या होर्डिंग्ज आणि पोस्टर-बॅनरच्या बेकायदेशीर उभारणीसंदर्भात हा एफआयआर २०१९ मध्ये नोंदवण्यात आला होता. सार्वजनिक मालमत्ता कायद्याचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राऊस अव्हेन्यू न्यायालयात दि. १८ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
( हेही वाचा : World Health Day निमित्त ‘आरोग्यम धनसंपदा’ विशेष उपक्रमाचे आयोजन)
शिवकुमार सक्सेना (Shivkumar Saxena) नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने पुढील सुनावणी १८ एप्रिल २०२५ रोजी राऊस अव्हेन्यू न्यायालयात (Rouse Avenue District Court ) होणार असल्याचा आदेश दिला. या याचिकेत असे म्हटले होते की, आप नेत्यांनी परवानगीशिवाय होर्डिंग्ज लावले होते.
यापूर्वी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) आणि मतियाला मतदारसंघातील आमदार गुलाब सिंह (Gulab Singh) यांच्याविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, पोलिसांनी तक्रारीची चौकशी केली नाही. त्यामुळे होर्डिंग्स कोणी आणि का लावले याची चौकशी करणे आवश्यक आहे. न्यायालयाने पोलिसांना १८ मार्चपर्यंत या प्रकरणात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. यापूर्वी २०२२ मध्ये द्वारका येथील न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला होता.
दरम्यान या प्रकरणात केजरीवाल (Arvind Kejriwal ), माजी आमदार गुलाब सिंह आणि माजी नगरसेवक नीतिका शर्मा (Nikita Sharma) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आम आदमी पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community