Farmers Protest : शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीतील सुरक्षा वाढवली

आता पुन्हा आपल्या शेतमालाला आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्याचा कायदा करावा, स्वामीनाथ आयोगाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी मंगळवारी (१३ फेब्रुवारी) दिल्लीत धडकणार आहेत. संयुक्त शेतकरी मोर्चासह तब्बल २०० शेतकरी संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.

188
Farmer Protest : शेतकरी संघटनांमध्ये आंदोलनावरून मतभेद

शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन (Farmers Protest) करणार आहेत. यामुळे दिल्लीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून हरियाणाची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीकडे येत आहेत. यामुळे राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना वर्षभर ऐतिहासिक आंदोलन (Farmers Protest) करत केंद्र सरकारला (Central Govt) तीन कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडले होते. २०२०-२०२१ या कालावधीत झालेल्या शेतकरी आंदोलाची चर्चा जगभर झाली होती. (Farmers Protest)

आता पुन्हा आपल्या शेतमालाला आधारभूत किंमत (MSP) हमी देण्याचा कायदा करावा, स्वामीनाथ आयोगाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी मंगळवारी (१३ फेब्रुवारी) दिल्लीत धडकणार आहेत. संयुक्त शेतकरी मोर्चासह तब्बल २०० शेतकरी संघटना या आंदोलनामध्ये (Farmers Protest) सहभागी होणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून केंद्रीय निमलष्कर दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्याच राज्यात रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात येत असल्याचा आरोप देखील शेतकरी नेत्यांनी केला आहे. (Farmers Protest)

(हेही वाचा – UPI, Rupay in Mauritius : भारताच्या युपीआय आणि रुपे कार्डांचा मॉरिशस, श्रीलंकेत विस्तार)

२०२०-२०२१ मध्ये दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनामध्ये (Farmers Protest) पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या आंदोलनासाठी देखील या राज्यांमधून जोरदार तयारी करण्यात येत आहे. सरकारने आपले उत्तर मंगळवारच्या आधी द्यावे, असे आवाहन शेतकरी संघटनांकडून करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांना त्यांच्याच राज्यात रोखण्यासाठी हरियाणा सरकार (Haryana Govt) प्रयत्न करत आहे. (Farmers Protest)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.