राष्ट्रपती भवनानंतरची दिल्लीतील सर्वात मोठी आणि सर्वात सुंदर वास्तू म्हणून ओळखली जाणारी वास्तू म्हणजे नवीन महाराष्ट्र सदन. इंडिया गेटला चिकटून असलेल्या नवीन महाराष्ट्र सदनाला पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. उत्तर भारतात उष्णतेची भीषण लाट आली आहे. अंगाची लाही लाही होत आहे. दिल्लीच्या काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. (Maharashtra Sadan)
अशात महाराष्ट्र सदनात थांबलेल्या एका केंद्रीय मंत्र्यांना बिसलेरीच्या पाण्याने अंघोळ करावी लागली. लोकसभेचा निकाल लागल्यापासून महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार दिल्लीत येत आहेत. ते महाराष्ट्र सदनात थांबले आहेत. या सर्वांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. (Maharashtra Sadan)
(हेही वाचा – CSMT Subway : तीन महिने एकच जिना अडवून बसली महापालिका, सांगा रेल्वे प्रवाशांनी चालायचे कसे?)
राजधानी नवी दिल्लीत पाणीटंचाई आहे. काल (रविवार) संध्याकाळपासून महाराष्ट्र सदनातील पाणी देखील बंद झाले आहे. एक केंद्रीय मंत्री महाराष्ट्र सदनात मुक्कामाला होते. मात्र, त्यांच्या अंघोळीसाठी पाणीच उपलब्ध नसल्याने फिल्टरच्या पाणी बाटलीतील पाण्याने त्यांना अंघोळ करावी लागली. (Maharashtra Sadan)
मिनरल वॉटरने अंघोळ केल्याची माहिती चुकीची – डॉ. अडपवार
दरम्यान, बिसलेरीच्या पाण्याने अंघोळ केल्याची बातमी निराधार असल्याची माहिती सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपवार यांनी “हिंदुस्थान पोस्ट”शी बोलताना दिली. ते म्हणाले की, दिल्लीत सर्वत्र पाण्याचा टंचाई आहे. याची थोडी फार झळ महाराष्ट्र सदनाला बसत आहे. पाणी टंचाई जाणवणार हे लक्षात येताच पाण्याचे व्यवस्थपण करण्यात आले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून दोन टँकर मागविण्यात येत असल्याचेही डॉ अडपवार यांनी सांगितले. (Maharashtra Sadan)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=6sPOT6LWQiY
Join Our WhatsApp Community