Halal : विधानसभेत हलाल बंदीची मागणी; अबू आझमींनी शायरी म्हणत हिंदूंना म्हटले ‘घुबड’

614

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात बुधवार, १३ डिसेंबर रोजी हलाल (Halal) उत्पादनांवरील बंदीचा विषय चर्चेत आला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन राज्यात हलाल बंदी करण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हलाल उत्पादनांवर बंदी आणण्याची मागणी केली. यावर माध्यमांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसीम आझमी यांना विचारले असता त्यांनी उर्दूत शायरी म्हणत हिंदूंना ‘घुबड’ म्हटले.

हलाल उत्पादनांच्या चौकशीची मागणी

‘उत्तर प्रदेशच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील ‘हलाल’ (Halal) उत्पादनांवर त्वरित बंदी घालण्यात यावी’, या प्रमुख मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांनी शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ डिसेंबर या दिवशी भेट घेतली होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘राज्यातील हलाल उत्पादनांची चौकशी करण्याचे’ आदेश दिले होते.

घुबडाला हुशार (घुबडासारखे शहाणे) मानले जाते आणि आपल्या भारतात घुबड हे लक्ष्मीचे वाहन असल्याचे म्हटले जाते. ज्यांचे पूर्वज मुघलांच्या तलवारीसमोर सलवार घालायचे त्यांनी आज हिंदूंना ज्ञान देणे बंद करावे.
– रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती. 

(हेही वाचा Maharashtra Assembly Session : संसदेतील घटनेचे महाराष्ट्र विधीमंडळात पडसाद; अभ्यागतांना प्रवेश बंद)

आमदार सरनाईकांनी विधानसभेतच ‘हलाल’वर बंदी आणण्याची मागणी

यानंतर आमदार सरनाईक यांनी विधानसभेतच हलाल (Halal) उत्पादनांवर बंदी आणण्याची मागणी केली. या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी विधिमंडळाच्या आवारात माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया विचारली असता, अबू आझमी यांनी उर्दू शायरीत ‘बर्बाद गुलिस्तर करने को बस एक ही उल्लू काफी था, हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम-ए-गुलिस्ता क्या होगा।’ असे म्हणत तडक निघून गेले. या शायरीचा अर्थ पाहता ‘बाग उद्ध्वस्त करण्यासाठी एक घुबड पुरेसे असते. आता तर प्रत्येक फांदीवर घुबड बसले आहे, तर त्या बागेची काय अवस्था होईल?’, असा होतो, यावरून अबू आझमी यांनी हलाल बंदीची मागणी करणारे हिंदू घुबड आहेत, असे शायरीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.