अफजल खान व औरंगजेबाची थडगी काढून टाकण्याची मागणी

153

छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणारे, स्वराज्य स्थापनेत अडथळा आणून, जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, संभाजी महाराजांचा खूप छळ केला होता. त्या स्वराज्याच्या शत्रूच्या थडग्यावर ‘एमआयएम’चे अकबरुद्दीन ओवैसी यांनी फुलांची चादर वाहिली होती. ती अत्यंत दुर्देैवी घटना आहे. महाराष्ट्रातील अफजल खान, औरंगजेबाची थडगी शासनाने त्वरित काढून टाकावीत, अशी मागणी क्षत्रिय मराठा महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी क्षत्रिय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दास शेळके, महादेव कदम, निरंजन नवगिरे, आर. डी. जाधव, संभाजी शितोळे, राजेंद्र चव्हाण, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

( हेही वाचा: ज्ञानव्यापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुचवले ‘हे’ तीन पर्याय )

औरंगजेबालाही याच भूमित गाडले पाहिजे

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या दौ-यावर असताना, एमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबच्या थडग्यावर फुलांची चादर वाहिली होती, या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. या प्रकरणावर देशभरातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी अकबरुद्दीन औवेसींवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली होती, ते म्हणाले औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही, वारंवार औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकवत महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न औवेसींकडून होत आहे. औरंगजेबाने आमची मंदिरे उध्वस्त केली, औरंगजेबाला ही महाराष्ट्राच्या याच मातीत गाडले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी दिली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.