सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगल प्रकरणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळा क्लीन चीट दिलेली असतानाही ‘बीबीसी न्यूज’ने ‘इंडिया द मोदी क्वेश्चन’ हा माहितीपट बनवला. याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलीसाठी दोषी ठरवून भारत, हिंदु समाज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा जागतिक स्तरावर जाणीवपूर्वक मलीन केली आहे. हा एकप्रकारे भारताचे पंतप्रधान आणि भारतीय न्यायसंस्था यांचा घोर अवमान आहे. या प्रकरणी ‘बीबीसी न्यूज’वर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलना’च्या माध्यमातून करण्यात आली. या मागणी सह विविध मागण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते.
बीबीसीने पंतप्रधान मोदी आणि २००२ ची गुजरात दंगल या विषयावर माहितीपट प्रकाशित केला होता. यावरून बराच वाद निर्माण झाला होता. फेसबुक, ट्विटरला या बीबीसीच्या माहितीपटाची लिंक काढावी असे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. बीबीसी ही ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली काम करणारी आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असून जगभरातील अनेक देशांमध्ये बीबीसीची कार्यालये आहेत. भारतात बीबीसीचे सर्वात मोठे कार्यालय दिल्ली येथे आहे. हिंदी, तमिळ, मराठी, गुजरातीसह अनेक भाषांमध्ये बीबीसीने विस्तार केला आहे.
(हेही वाचा – ‘बीबीसी’ची डॉक्युमेंट्री हा कट!)
Join Our WhatsApp Community