मढ, मार्वेतील अस्लम शेख यांच्या अनधिकृत स्टुडिओंवर हातोडा 

144

मढ, मार्वे हा परिसर कायम चर्चेत येत असतो, या ठिकाणी स्टुडिओमध्ये अश्लील चित्रीकरण केले जाते म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राजकुंद्रा यांना अटक करण्यात आली होती, आता या ठिकाणच्या स्टुडिओमुळे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख चर्चेत आहेत . भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी या ठिकाणी अस्लम शेख यांचे ४९ अनधिकृत स्टुडिओ असल्याचा आरोप केला आहे. हे स्टुडिओ तोडण्याचे काम सुरु झाले आहे, अशी माहिती सोमय्या यांनी ट्विट करून दिली आहे.

आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप 

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,आणि कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्यावर निशाणा साधला. मंगळवारी, १३ सप्टेंबर रोजी सकाळी मिलेनियर सिटी स्टुडिओ पाडण्याचे काम सुरु झाले आहे. आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्या कृपेने १ हजार कोटी रुपयांचे मढ, मार्वेमध्ये ४९ अनधिकृत स्टुडिओ बांधले आहेत. भ्रष्टाचाराचे स्मारक असलेले हे सर्व स्टुडिओ आम्ही तोडून टाकू, असे किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना कॅबिनेट मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी हे स्टुडिओ बांधल्याचा आरोप केला आहे. तसेच यामध्ये सीआरझेड आणि एनडीझेडच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बनावट कागदपत्रे, खोट्या परवानगीच्या मदतीने हजारो चौरस मीटर जागेवर अनधिकृतपणे स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये बीएमसी आणि एमसीझेडएमए (महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी)च्या अधिकाऱ्यांसोबतही संगनमत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

(हेही वाचा वक्फ बोर्डाचा मनमानी कारभार! हिंदू बहुसंख्य असलेल्या संपूर्ण गावावरच सांगितली मालकी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.