Indians Deportation from US : काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी राहुल गांधी, खरगे यांना दाखवला आरसा 

अवैध भारतीयांना अमेरिकेने पहिल्यांदा भारतात पाठवले (Indians Deportation from US) नाही. बायडेन यांच्या राजवटीतही सप्टेंबर २०२४ मध्येही १ हजार १७४ अवैध भारतीयांना अमेरिकेने भारतात परत पाठवले होते, असे शशी थरूर म्हणाले.

90

अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने अमेरिकेत अवैधपणे राहत असलेल्या १०४ भारतीयांना अमेरिकेच्या सैन्य दलाच्या विमानातून भारतात आणून सोडण्यात आले. (Indians Deportation from US) संसदीय अधिवेशन सुरु असतानाच ही घटना घडल्यावर विरोधकांनी सत्ताधारी भाजपावर आगपाखड सुरु केली. यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा प्रकार म्हणजे अमेरिकेने भारताचा केलेला अपमान असल्याचे म्हटले. राज्यसभेतही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी आकांडतांडव केला. त्या सर्वांनाच मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि परराष्ट्र व्यवहार संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी ट्रम्प सरकारने केलेल्या कारवाईचे (Indians Deportation from US) समर्थन करत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना आरसा दाखवला आहे.

(हेही वाचाvalentine’s day quotes : व्हेलेंटाईन डे येतोय; तुमची तयारी झालीय का? valentine’s day साठी सर्वोत्तम quotes वाचा इथे!)

काय म्हणाले शशी थरूर? 

अवैध भारतीयांना अमेरिकेने पहिल्यांदा भारतात पाठवले (Indians Deportation from US) नाही. बायडेन यांच्या राजवटीतही सप्टेंबर २०२४ मध्येही १ हजार १७४ अवैध भारतीयांना अमेरिकेने भारतात परत पाठवले होते. ७ लाख २५ हजार भारतीय ज्यांच्याकडे कोणताही कागदोपत्री पुरावा नाही, ते अवैध असून त्यांना परत पाठवणे अमेरिकेला आवश्यक वाटते. मागील ४ वर्षांत ७० हजार भारतीय कॅनडा आणि मेक्सिकोच्या सीमेवरून अमेरिकेत गेले. ते सर्व जण अवैध भारतीय आहेत. त्यांना पुन्हा  अमेरिकेने भारतात पाठवणे (Indians Deportation from US) यात कोणताही आक्षेपार्ह बाब नाही. त्यांना भारताने स्वीकारलेच पाहिजे. भारतीयाने व्हिसा, पासपोर्टसह अमेरिकेत नोकरीसाठी, पर्यटनासाठी, शिक्षणासाठी जावे, यात काहीही हरकत नाही.  जर तुम्ही कोणत्याही कागदपत्राशिवाय अमेरिकेत राहत असाल तर तुम्ही त्या देशाचा कायदा मोडत आहात. उद्या जर अमित शाह अवैध बांगलादेशींना पकडतील तर ते त्यांनाही त्यांच्या देशात पाठवतीलच. हाच न्याय अमेरिकेत राहणाऱ्या अवैध भारतीयांना लागू होतो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.