Assembly Session : अजित पवारांचे लक्ष जयंत पाटलांवर!

77
Assembly Session : अजित पवारांचे लक्ष जयंत पाटलांवर!
  • खास प्रतिनिधी 

विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) आमदार जयंत पाटील यांच्यावर आपले लक्ष असल्याची कबुलीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली. (Assembly Session)

पाटलांकडून नार्वेकरांची स्तुती

सोमवारी ९ डिसेंबर २०२४ या दिवशी, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव विधानसभेत मांडला. त्याला समर्थन देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पाटील यांनी नार्वेकर यांची त्यांनी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाची स्तुती केली आणि पुढील पाच वर्षे चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त केली. (Assembly Session)

(हेही वाचा – ‘मेक इन इंडिया’पाठोपाठ Wed In India देणार पर्यटनाच्या अर्थव्यवस्थेला बळ; पंतप्रधानांनी दिला तरुणांना सल्ला)

‘किती लक्ष आहे बघा माझ्यावर’

सभागृहात बोलताना पाटील यांनी १९९० चा एक किस्सा सांगितला. तेव्हा जयंत पाटील यांनी ‘आपण १९९० मध्ये पहिल्यांदा अध्यक्ष झालो’ असा उल्लेख त्यांच्याकडून चुकून करण्यात आला. त्यात सुधारणा सुचवत समोरच सत्ताधारी बाकावर बसलेल्या अजित पवार यांनी ‘पहिल्यांदा आमदार झालात’ असे म्हटले. त्यावर पाटील यांनी ‘किती लक्ष आहे बघा माझ्यावर..’ अशी मिश्किल टिप्पणी केली आणि सभागृहात दोन्ही सत्ताधारी-विरोधी बाकांवर एकच हशा पिकला. (Assembly Session)

योग्य वेळी योग्य निर्णय

त्यावर गप्प बसतील ते अजित पवार कसले? अजितदादांनी लगेचच हसत हसत ‘माझं लक्ष असून काय उपयोग? प्रतिसाद देयाय का?’ असा थेट प्रश्नच केला. त्याला पाटील यांनी पुन्हा उत्तर दिले. ते म्हणाले, “आमच्या पक्षाचं एक वाक्य आहे..” असं बोलल्यानंतर त्यांनी स्वतःच पुन्हा त्यात दुरुस्ती करत लेगेचच म्हणाले, “दादा.. आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे, योग्य वेळी योग्य निर्णय.” (Assembly Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.