राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (Nationalist Congress) नेत्यांनी मंगळवारी (०९ जुलै) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सकाळी सिद्धिविनायकांचे (Ajit Pawar Siddhivinayak) दर्शच घेतले. दरम्यान, १४ जुलै रोजी बारामतीमध्ये अजित पवारांच्या पक्षाची पाहिली जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेद्वारे ते विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, आता आम्ही पुढच्या कामाला म्हणजे विधानसभेच्या तयारीला लागण्यास मोकळे झाल्याची प्रतिक्रिया दिली. (Ajit Pawar)
पुढे, अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ”अतिशय महत्वाचा आजचा दिवस आहे. मंगळवार असल्याने दर्शनासाठी आजचा दिवस ठरवला होता. आम्ही सर्वांनी एकत्र दर्शन घेतले. चांगल्या कामाची सुरुवात देवाचे दर्शन घेऊन केली जाते. आम्ही आता पुढच्या कामाला लागणार आहोत. जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावे यासाठी व्हिक्टरीची खून दाखवली. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी समोर जाणार”, असे अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar)
(हेही वाचा – पतंजलीने १४ उत्पादनांची विक्री थांबवली, Supreme Courtने सांगितले…)
१४ जुलै बारामतीमध्ये पहिली सभा
प्रसारमाध्यांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी पहिली सभा बारामतीमधून सुरू करणार आहोत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काय निर्णय घेतले? कुठल्या योजना दिल्या? त्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. उद्याच्या काळात पुढे वाटचाल करताना विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहे. याची सुरुवात दर्शनाने केली”. (Ajit Pawar)
(हेही वाचा – पतंजलीने १४ उत्पादनांची विक्री थांबवली, Supreme Courtने सांगितले…)
सुनिल तटकरे म्हणाले…
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रायगड जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे (Ajit Pawar) म्हणाले की, “अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंगळवारी आम्ही सर्वांनी सिद्धिविनायचे दर्शन घेतले आहे. आम्हाला सिद्धिविनायचे पूर्ण पाठबळ मिळेल असा आमचा विश्वास आहे.” येणाऱ्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सिद्धिविनायकाला साकडे घातले असे तटकरे म्हणाले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community