उपमुख्यमंत्री Ajit Pawar कोल्हापूरच्या दौऱ्यावर; म्हणाले, ऐतिहासिक नाट्यगृह… 

118
उपमुख्यमंत्री Ajit Pawar कोल्हापूरच्या दौऱ्यावर;  म्हणाले, ऐतिहासिक नाट्यगृह... 
उपमुख्यमंत्री Ajit Pawar कोल्हापूरच्या दौऱ्यावर;  म्हणाले, ऐतिहासिक नाट्यगृह... 

कोल्हापूर शहराचा सांस्कृतिक वैभवला गुरुवारी (०८ ऑगस्ट) धक्का बसला. शहरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह (Keshavrao Bhosle Theatre) अग्नीतांडवामुळे जळून खाक झाले. शंभर वर्षांची परंपरा असलेले नाट्यगृह जळून खाक होताना पाहून अनेक अभिनेत्यांना आश्रू अनावर झाले. अनेक अजरामर नाटके अन् असंख्य कलाकार घडवणारे हे नाटयगृह जळताना कलाकारांना त्यांचा आश्रूंचा बांध रोखता आला नाही. त्यातून सावरत नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्यभरातील रंगकर्मींनी पुढाकार घेतला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केलेला निधी वेळेतच देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी रविवारी दिली.  (Ajit Pawar)

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या पवारांनी रविवारी (११ ऑगस्ट) सकाळी नाट्यगृहाची पाहणी केली. यावेळी उपस्थित कलावंतांशी त्यांनी संवाद साधला. ऐतिहासिक वास्तूचे बारकावे आहे तसेच पुन्हा उभारण्यासाठी वेळ लागू शकतो, परंतु कामे चांगली होतील. लाकडी काम, दगडी काम आणि सिसम सारख्या लाकडांचा वापर होणार असल्याने बारकावे लक्षात घेवून नाट्यगृह उभारण्याच्या सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या. 

(हेही वाचा – Azad Maidan Riots : महाराष्ट्राच्या मानहानीची लक्तरे १२ वर्षांनंतरही चव्हाट्यावरच)

उपमुख्यमंत्री पवार विमानतळावरून थेट केशवराव भोसले नाट्यगृहात आले. प्रारंभी त्यांनी भस्मसात झालेल्या मुख्य रंगमंचाची पाहणी केली. तेथे नाट्यगृहाची उंची वाढविण्याच्या सूचना केल्या. कलावंत, प्रेक्षक तसेच कोल्हापूरवासियांप्रमाणेच (Keshavrao Bhosle Theatre, Kolhapur) आमच्याही भावना या नाट्यगृहाशी जोडल्या आहेत. हे पुनर्बांधनीचे काम मोठं असून यासाठी लागणारा वेळ आर्किटेक्चरच सांगतील असेही ते म्हणाले. जाहीर निधीपेक्षा जास्त लागला तरी तो दिला जाईल, मात्र नाट्यगृह पुर्वीसारखे पुन्हा तयार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्तांना दिल्या. (Ajit Pawar)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.