अजित पवारांच्या अडचणी वाढल्या! कोणी केली कारवाई?

एकूण १००० कोटी रुपयांची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त करण्याच्या संदर्भात अजित पवारांना नोटीस

101

तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली, यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आज सकाळी अजित पवार यांच्याशी संबंधित कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त करण्याची नोटीस आयकर विभागाकडून बजावण्यात आली आहे. आयकर विभागाने ज्या १००० कोटींची संपत्ती जप्त करण्याच्या संदर्भात नोटीस बजावली आहे, त्यामध्ये एक साखर कारखाना, दक्षिण दिल्लीतील एक फ्लॅट, गोव्यातील मालमत्ता, मुंबईतील निर्मल इमारतीचा समावेश असल्याचा माहिती मिळतेय.

पवारांच्या संबंधित मालमत्ता जप्तीची नोटीस

गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतर आता आयकर विभागाने अजित पवारांच्या संबंधित मालमत्ता जप्तीची नोटीस काढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात आयकर विभागाने दोन रिअल इस्टेट ग्रुप आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती. यावेळी १८४ कोटींची बेहिशोबी मालमत्त्ता सापडली होती. आयकर विभागाने ७ ऑक्टोबरपासून ७० पेक्षा अधिक ठिकाणांवर छापेमारी केली होती. दरम्यान २८ ऑक्टोबर २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीकडून झाडाझडती करण्यात आली. जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे. ७ ऑक्टोबर २०२१ अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. यासोबतच अजित पवार यांच्या बहिणींच्या घर, कार्यालयांवरही आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली होती.

(हेही वाचा – आतापर्यंत ५ मंत्र्यांना अटक! ४ राष्ट्रवादीचेच!)

‘या’ संपत्तीवर जप्तीचे आदेश

  • जरंडेश्वर शुगर फॅक्ट्री (बाजार मूल्य: सुमारे ६०० कोटी)
  • साऊथ दिल्लीमधीली फ्लॅट (बाजार मूल्य: सुमारे २० कोटी)
  • पार्थ पवार यांचं निर्मल ऑफिस (बाजार मूल्य: सुमारे २५ कोटी)
  • निलय नावाने गोव्यात बनलेला रिसॉर्ट (बाजार मूल्य: सुमारे २५० कोटी)
  • महाराष्ट्रात २७ वेगवेगळ्या ठिकाणी जमीन (बाजार मूल्य: सुमारे ५०० कोटी)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.