येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळणार आहे. चिन्हाचा निर्णयही त्यांच्याच बाजूने येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल ( Praful Patel )यांनी बीड येथील जाहीर सभेत सांगितले.
बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर रविवारी सायंकाळी सभेत प्रफुल्ल पटेल बोलत होते. पटेल म्हणाले की,आम्ही सुध्दा म्हणतोय की, राष्ट्रवादीत कुठलीच फूटनाही. अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला निर्णय सामुदायिक होता. तो लोकशाही मार्गाने घेतलेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने कोणाकडे राहणार अशी शंका लोकांमध्ये आहे. त्यामुळे मी आपल्याला आवर्जून सांगतो की १०० टक्के निर्णय अजित पवारांच्या बाजूनेच लागेल असा विश्वासही आपल्याला असल्याचे प्रफ्फुल पटेल यांनी सांगितले.
(हेही वाचा : Pune Guardian Minister : पुण्यात चंद्रकांत पाटलांसमोर अजित पवारांचे आव्हान)
अनेक लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत वेगवेगळी भूमिका मांडत आहे. आम्ही सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबींचा विचार करून मगच हा निर्णय घेतला असल्याचेही पटेल यांनी त्यांच्या भाषणात बोलताना सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community