- मुंबई प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रालयात येणाऱ्या कार्यकर्त्यांना व नागरिकांना अडचण होऊ नये म्हणून पक्ष कार्यालयात जनता दरबार भरवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस प्रत्येक मंत्र्यांनी पक्ष कार्यालयात उपस्थित राहून लोकांच्या तक्रारी ऐकाव्यात, असा आदेशही त्यांनी दिला होता. परंतु, सहा आठवड्यांनंतरही अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एकही जनता दरबार भरवलेला नाही, त्यामुळे ते पक्षश्रेष्ठींच्या आदेशांकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा रंगली आहे.
(हेही वाचा – QR Code स्कॅन करताच तक्रार दाखल होणार ; 24 तासांत घेतली जाईल दखल)
इतर मंत्र्यांनी आदेश पाळले, मुंडे मात्र अपवाद
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) इतर सर्व मंत्र्यांनी जनता दरबार घेतला असून, त्यांनी कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. मात्र, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अद्याप एकदाही पक्ष कार्यालयात जनता दरबार भरवलेला नाही. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात नाराजीचा सूर उमटत आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट निर्देश देऊनही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दुर्लक्ष केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
(हेही वाचा – Maha kumbh 2025: योगी सरकारचा मोठा निर्णय ; ९० हजार कैद्यांना मिळणार महाकुंभमेळ्यात स्नानाची संधी)
धनंजय मुंडे आदेश पाळणार की पक्षांतर्गत नाराजी वाढणार?
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या मुंडे यांच्यावर पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जनता दरबार ही महत्त्वाची संकल्पना असूनही मुंडे यांनी सहा आठवड्यांपासून दुर्लक्ष केल्याने, पक्षातील काही गट त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. आता धनंजय मुंडे (Dhananjay Munde) जनता दरबार भरवून कार्यकर्त्यांची नाराजी दूर करतात की पक्षश्रेष्ठी त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community