कोलकतामधील ‘त्या’ घटनेवर उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis यांचा विरोधकांना सवाल; म्हणाले…  

136
कोलकतामधील ‘त्या’ घटनेवर उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis यांचा विरोधकांना सवाल; म्हणाले...  
कोलकतामधील ‘त्या’ घटनेवर उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis यांचा विरोधकांना सवाल; म्हणाले...  

राज्यसह देशात विविध ठिकाणी होत असलेल्या महिलांवरील अत्याचारांसंदर्भात महाविकास आघाडीतील लोकांनी ‘या’ प्रकरणावर बोलण्यासाठी तोंड उघडले नाही. असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यांनी उपस्थित केला आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या (Mukhyamnatri Majhi Ladki Bahin Yojana) वचनपूर्ती सोहळ्यानिमित्त कोल्हापूर येथे ते महिला भगिनींशीं संवाद साधत होते. (Devendra Fadanvis)   

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुलगी कोणतीही असो ती आपलीच असते. कोलकत्त्यामधील एका डॉक्टर तरुणीवर (Kolkatta Dr Rape Case) भयानक अत्याचार झाले. मात्र महाविकास आघाडीतील लोकांनी त्या प्रकरणावर बोलण्यासाठी तोंड उघडले नाही. अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. कोलकत्यातील डॉक्टर तरुणीवर अत्याचारानंतरही विरोधी पक्षातील (MVA) लोक ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या सरकारचे कौतुक करताना दिसत आहेत. 

(हेही वाचा – फाशीच्या शिक्षेवरुन विरोधकांच्या ‘त्या’ प्रश्नाला CM Eknath Shinde यांचे प्रत्युत्तर)

पुढे फडणवीस म्हणाले की, एका शब्दाने देखील त्या घटनेचा निषेध नोंदवला नाही. मात्र महाराष्ट्रात अशीच घटना घडल्यावर हे लोक सरकारने राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या करू लागले आहेत. असा आरोप गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे.

आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी रडायचे नाही तर लढायचे सांगितलेले आहे. आम्ही पळून जाणारे नाही तर लढणारे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. अशा प्रकरणामधील नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. मग काहीही झाले तरी चालेल, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना राजकारण करायचे तर करू द्या, मात्र आम्ही संवेदनशील असल्याचे मी येथे ठणकावून सांगत असल्याचे फडणवीस म्हणाले. (Devendra Fadanvis)

(हेही वाचा – Samsung ने भारतात गॅलॅक्‍सी वॉचेसमध्‍ये आणली इररेग्‍युलर हार्ट रिदम नोटिफिकेशनची सुविधा)

कोल्हापूर मधील तपोवन मैदानावर (Kolhapur Tapovan Ground) महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हजेरी लावली. (Devendra Fadanvis)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.