गुजरात विजयाने सर्व रेकॉर्ड मोडले – देवेंद्र फडणवीस

128

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व असा विजय प्राप्त झाला आहे. या विजयाने आजवरचे रेकॉर्ड मोडले. 27 वर्षे राज्य करूनही जो विश्वास मतदारांनी दाखवला, त्यावरून हेच स्पष्ट होते की लोकांना वाटते फक्त मोदीच विकास करू शकतात. गुजरात मोदीमय होते, मी जेव्हा सभांना गेलो तेव्हाच ते मी अनुभवले. मोदींचे नाव घेताच लोकांमध्ये अभुतपूर्व उत्साह दिसून येत होता. तेव्हाच पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार स्पष्ट झाले होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले.

आप फक्त दिल्लीपुरताच पक्ष 

भाजपाने पुन्हा एकदा गुजरातमध्ये सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी देखील रिंगणात असल्यामुळे निवडणूक चुरशीची होईल असे वाटत होते, मात्र सर्वांचे अंदाज चुकवत भाजपाने गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यानंतर फडणवीस यांनी काँग्रेस आणि आपला टोला लगावला आहे. काँग्रेस गुजरामध्ये आजवरच्या सर्वात निचांकी स्थानी आहे. तसेच आमचाच विजय होणार असे लिहून देणारा आप हा फक्त दिल्लीपुरता मर्यादीत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

(हेही वाचा पाटणमध्ये लव्ह जिहाद; वासनांध मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदू मुलीला मारहाण करत लैंगिक अत्याचार )

हिमाचलचा ट्रेंड

हिमाचल प्रदेशचा तो ट्रेंडच आहे. तिथे दर पाच वर्षांनी सत्ता बदलते. आम्हाला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा एक टक्का कमी मते मिळाली. काँग्रेसला जास्त मतदान झाले. आम्हाला जर एक टक्का जास्त मतदान झाले असते, तर आम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलो असतो, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.