शिंदे गटाचे बांगर यांची प्राचार्यांना मारहाण; देवेंद्र फडणवीस म्हणाले,…योग्य कारवाई करू

deputy chief minister devendra fadnavis reaction on santosh bangar beating up the principal
शिंदे गटाचे बांगर यांची प्राचार्यांना मारहाण; देवेंद्र फडणवीस म्हणाले,...योग्य कारवाई करू

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची पुन्हा दादागिरी समोर आली आहे. हिंगोलीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयीतील प्राचार्यांना बांगरांनी शिवगाळ करत मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून यामध्ये प्राचार्यांचे कान पकडत बांगर मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. आता याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून या घटनेबाबत माहिती घेऊन योग्य कारवाई करू असे फडणवीस म्हणाले.

माहितीनुसार बांगर यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ दोन ते तीन दिवसांपूर्वीचा आहे. बांगर यांनी मारहाण केलेल्या प्राचार्यांचे नाव अशोक उपाध्याय आहे. संबंधित प्राचार्यांना का मारहाण केली, याचे मात्र कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नेमके काय घडलेय याची माहिती मला नाही. पण त्याची माहिती घेऊन योग्य कारवाई करू.

तसेच या घटनेबाबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले की, ‘शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांकडून अशाप्रकारच्या वारंवार घटना घडत आहेत. तसेच भाजप आमदारांकडून घडतायत. सतत सत्तेत बसणारे आमदार, अधिकाऱ्यांना आणि सामान्यांना मारहाण, बळजबरी करताना दिसतायत. पण याचा खूप मोठा परिणाम भाजपच्या मतदातांवर पडताना दिसतोय. भाजपने कोणाशी आघाडी केली आहे, याचा प्रत्यय पदोपदी सर्व आमदार आणून देतायत.’

(हेही वाचा – दावोस दौऱ्यावरील आरोपांवरून दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंचा काढला कॉमनसेन्स)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here