उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis म्हणाले, फेक नरेटीव्ह जास्त दिवस टीकत नाही; विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

148
उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis म्हणाले, फेक नरेटीव्ह जास्त दिवस टीकत नाही; विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचे आवाहन
उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis म्हणाले, फेक नरेटीव्ह जास्त दिवस टीकत नाही; विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचे आवाहन

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मेळावे, बैठका, सभा यासह अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच गेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) आलेली निराशा पुन्हा येऊ नये यासाठी भाजपासह (BJP) मित्रपक्षांनी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकायला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथून विरोधी पक्षांवर हल्लाबोल चढविला.  (Devendra Fadnavis)

पुणे येथील सभेत देवेंद्र फडणवीस म्हणले की, फेक नरेटीव्ह (Fake Narrative) जास्त दिवस टीकत नाही त्यांला खऱ्या नरेटीव्हने उत्तर द्या. भाजपाच्या योजना लोकांपर्यत पोहचवा. विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका, असे म्हणत भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना फ्री हँड दिला आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी काही मर्यादित काळासाठी आरक्षण दिले होते. तो काळ संपत असताना युतीचे सरकार होते, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला, आज जे आरक्षण चालले आहे ते अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा वाढवल्याने म्हणून या देशात संविधानाने दिलेले आरक्षण सामान्य लोकांना मिळत आहे, असे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा –Kedarnath Landslide: केदारनाथमध्ये घडली दुर्घटना! दरड कोसळून ३ भविकांचा मृत्यू, अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती  )

शरद पवारांनी आरक्षण का दिले नाही

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, काही जण महायुती निवडून आली तर आरक्षण संपवणार, संविधान बदलणार असे खोटे नरेटीव्ह पसरवत आहेत. फेक नरेटीव्हला जास्त दिवस टीकत नाही. खोटे जास्त दिस टिकत नाही. यांच्या खोट्या विजयाचा फुगा विधान परिषदेच्या निवडणुकीत यांचा फुटला आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. दुफळी निर्माण झाली आहे. अनेक समाज एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. काही नेत्यांना वाटते हे समाज जर एकमेकांसमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ, ते केवळ राजकारण करु पाहत आहे. सरकार येते जाते,पण समाज एकसंध राहिला पाहिजे. समाजातील दुफळी लवकर दूर होणार नाही. गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे. 1982 साली आण्णासाहेबांनी आरक्षणासाठी स्वत:ला गोळी मारुण घेतली. शरद पवार यांनी का आरक्षण दिले नाही. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही हे कोण म्हटले हे सर्व समाजाला माहिती आहे. आम्ही आरक्षण दिले आणि ते टिकवले सुद्धा. पण मविआचे सरकार आले आणि त्यांनी ते टिकवले नाही. पुन्हा आमचे सरकार आल्यावर आरक्षण दिले.  (Devendra Fadnavis)

तुमची भूमिका स्पष्ट करा

आरक्षण प्रश्नांवरुन शरद पवार(Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), नाना पटोले आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाबाबत तुमची भूमिका काय आहे, दुटप्पी भूमिका घेऊ नका मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्सासाठी तुमचे समर्थन आहे का? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. दोन्ही समाजाला अधांतरी ठेवू नका. समाजाला न्याय मिळवून देण्सासाठी आमची शिव्या खाण्याची तयारी आहे. पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.

(हेही वाचा – Chandrapur Monsoon Update: चंद्रपूरमध्ये पावसाचा रुद्रावतार! शेकडो घरे पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत )

थोडी मेहनत घ्या

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकाने मुलीचे 100 टक्के शिक्षण मोफत केले आहे. तर गृहिणीसाठी 3 सिलेंडर देण्यात येत आहे. 2013 मध्ये या ठिकणी निवडणूक लढवली त्यानंतर 2014 मध्ये आपण बहूमतासह जिंकली. निवडणूक आपण 4 जणांविरोधात लढत होतो, आपण फेक नरेटीव्हला खऱ्या नरेटीव्हने उत्तर देणार आहोत. अवघ्या काही मतांनी आपला पराभव झाला आहे, थोडी जास्त मेहनत घ्यायची गरज आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (DCM Devendra Fadnavis)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.