उपमुख्यमंत्री Eknath Shinde १९ फेब्रुवारीला महाकुंभमेळ्यात सहभागी होणार

71

मुंबई प्रतिनिधी 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या १९ फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार असून, आपल्या पक्षातील सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह कुंभस्नान करणार आहेत. हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी होताना, शिंदे हे हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शह देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Eknath Shinde)

हिंदुत्वाच्या मुद्यावर शहाचा प्रयत्न

उद्धव ठाकरे यांच्यावर राजकीय विरोधकांकडून सातत्याने हिंदुत्व (Hindutwa) सोडल्याचा आरोप केला जातो. अशा पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री शिंदे हे आपल्या आमदार, खासदारांसह कुंभस्नान (Shivsena Mahakumbh sthan) करणार असल्याने, त्याचा राजकीय संदर्भ जोडला जात आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर प्रमुख नेत्यांनी देखील कुंभमेळ्यात स्नान केले आहे. शिंदे यांच्या या उपस्थितीमुळे पक्षाच्या ताकदीचेही प्रदर्शन होणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – दिल्लीतील RSS च्या नवीन मुख्यालयात 19 फेब्रुवारीपासून कामकाजाला सुरुवात)

शिवसनेच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात
दरम्यान, शिवसेनेच्या काही आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याने नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. यापूर्वी महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, आता त्यात कपात करत वाय स्तरावर आणण्यात आले आहे. त्यामुळे हे आमदार नाराज झाले असून, त्यांनी ही बाब उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर घातल्याची माहिती मिळाली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.