देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. अशापरिस्थितीत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन देखील ओमिक्रॉनची लागण होतांना दिसतेय. त्यामुळे बूस्टर डोस घेणं कितपत आवश्यक आहे. याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यंनी बूस्टर डोस संबंधी स्पष्ट भूमिका मांडली असून केंद्राला पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
देश पातळीवर निर्णय व्हावा
“ज्यांनी दोन डोस घेतले होते त्यांनाच याची बाधा झाल्याचं दिसत आहे. तर मग बूस्टर डोसची गरज आहे का? आज आपल्याकडे डोस उपलब्ध आहेत. त्यासंबंधी देश पातळीवर निर्णय झाला पाहिजे.” असे अजित पवार म्हणाले. यासह पुढे ते असेही म्हणाले की, बुस्टर डोससंबंधी जी चर्चा सुरु आहे त्याबद्दल वेगवेगळा मतप्रवाह आहे. तो द्यायचा की नाही याबद्दल काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. त्यासंबंधी तज्ज्ञ लोकच सांगू शकतात.
(हेही वाचा -डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई लोकलकडून विशेष सेवा)
WHO ने तातडीनं पावलं उचलावी
देशातील ओमिक्रॉनचं वाढतं संकट लक्षात घेता केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने धोरण जाहीर करून त्यांची योग्य अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. ज्या-ज्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत, तिथे एक वेगळी विशिष्ट नियमावली असायला हवी. तसेच कोरोना लसीनंतर बूस्टर डोस संदर्भातील निर्णय केंद्राने लवकरात लवकर स्पष्ट करावा. बुस्टर डोस द्यायचा आहे, तर तो का द्यायचाय? आणि जर नाही द्यायचाय, तर का नाही द्यायचाय? याचं स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे. असंही अजित पवार म्हणाले. तसेचस ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने तातडीने पावलं उचलली पाहिजे, असेही मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
Join Our WhatsApp Community