ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर पोलीस बदल्यांमध्ये मोठी देवघेव झाल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. पण यावरुन गोपनीयतेचा भंग आणि टेलग्रॅफिक अॅक्टनुसार मुंबई पोलिसांनी फडणवीस यांना नोटीस बजावली. या नोटीशीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी महाराष्ट्रात जे काही नोटिसा देणं चालू आहे, ते याआधी महाराष्ट्रात कधीही झालेलं नाही, असं म्हणत सरकारला घरचा आहेर दिला आहे.
प्रत्येकाने आपलं काम करावं
पुण्यात रविवारी अजित पवारांचे 31 ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. सूस भागातील एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली, अजित पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. अजित पवारांनी सर्वच राजकीय पक्षांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला. फडणवीसांना आलेल्या नोटिसीबाबत भाजप आंदोलन करणार असल्याचे सांगितल्यावर, सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, असं सांगितलं. महाराष्ट्रात आणि देशात अशा नोटिसा पाठवण्याची पद्धत नव्हती, वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर केला जात नव्हता. मी यासंदर्भात पंतप्रधानांशीही बोललो आहे. प्रत्येकाने आपलं काम करावं, असं अजित पवार म्हणाले.
( हेही वाचा बेकायदेशीर बॅनर, होर्डिंग लावाल तर खबरदार… )
विकासावर लक्ष द्या
लोकांना आरोप प्रत्यारोपात रस नाही. आज पुण्यातील सूसमध्ये मी आलो आहे. इथल्या लोकांना पाण्याचा, ड्रेनेजचा, विजेचा, स्मशानभूमीचा प्रश्न सुटावा असं वाटत आहे. कृपा करुन सगळ्यांनी वेळ घालवू नका. सर्वांनी मिळून हे बंद केलं पाहिजे आणि विकासाला महत्त्व दिलं पाहिजे, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community