अजित पवारांनी आमदारांना दिले शिस्तीचे धडे! म्हणाले, मुख्यमंत्र्यांची तरी खूर्ची सोडा!

212

सध्या विधानसभेत आमदारांकडून बेशिस्तीचे वर्तन सर्रास होत आहे. अखेर याची उप मुख्यमंत्री अजित पवार दखल घेत आमदारांकडून होत असलेल्या चुकीच्या वर्तनाचा पाढाच वाचला. ज्यामध्ये आमदार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चाचाही सन्मान करत नाहीत, असे मत मांडले.

सुरुवातीला मधुकरराव चौधरी अध्यक्ष असताना आम्ही आमदार होतो. तेव्हा केवढा दरारा असायचा. ते उभे असतील तर आम्ही क्रॉस करायचो नाही. आता तर आमच्या सीटवर कोणीही येऊन बसतो. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरही येऊन बसतात. शेवटी त्याला सांगावे लागले, अरे बाबा, ही मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे. तेवढी तरी राहू दे. तुला 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर बस. पण सदस्य ऐकत नाही, असेही पवार म्हणाले.

अध्यक्षांचा सन्मान होत नाही

आपण कसे वागतो याचे सदस्यांना जराही भान राहिलेले नाही. सभागृहात येता-जाताना नमस्कार करायचा याचेही सदस्यांना भान राहिले नाही. पूर्वी कॅबिनेटमंत्री पुढे बसायचे. आम्ही पाठी बसून त्यांच्याशी बोलायचो. त्यांना सभागृहात डिस्टर्ब करायचो नाही. आता एक पत्र दिल्यावर दहा मिनिटाने दुसरे पत्र देतात. अरे एकदाच काय द्यायचे ते द्या ना बाबा. पण सर्वांनी शिस्त पाळा. क्रॉसिंग तर कुणाला कळत नाही. कोण कुठे उभे आहे, हेच माहीत नाही. कसेही क्रॉसिंग केले जाते. तिथे तर बऱ्याचदा बोलत असतात. इथे कोणतरी बोलत असतात. अध्यक्षांकडे पाठ असते. अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते. आल्यावर त्यांना नमस्कार करून बसायचे असते. जातानाही नमस्कार करायचा असतो एवढी साधी गोष्टही त्यांना कळत नाही, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! आता पुढे काय?)

‌कुत्रे, मांजर, कोंबड्यांचे प्रतिनिधीत्व करत नाही

ज्यावेळी आम्ही निवडून आलो.‌ त्याकाळात विधीमंडळाचे कामकाज लाईव्ह होत नव्हते. परंतु आता दोन्ही सभागृहाचे कामकाज लाईव्ह होते. राज्य आणि माध्यमे आपल्याकडे पहात आहेत. त्यामुळे प्रत्येकाने संसदीय शिष्टाचाराचे पालन केले पाहिजे. आमदारांना दोन – दोन लाख मतदार मतदान करुन विधानसभेत पाठवत असतात. त्यांचे प्रतिनिधीत्व आमदाराला करायला हवे‌. कुत्रे, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचे प्रतिनिधीत्व आपण करत नाही हे सर्वांनी ध्यानात ठेवावे अशा शब्दात अजित पवार यांनी सर्वांना खडसावले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.