अरे ला का रे, असं मलाही म्हणता येईल: Ajit Pawar यांनी विरोधकांना सुनावले

अरे ला का रे, असं मलाही म्हणता येईल: Ajit Pawar यांनी विरोधकांना सुनावले

48
अरे ला का रे, असं मलाही म्हणता येईल: Ajit Pawar यांनी विरोधकांना सुनावले
अरे ला का रे, असं मलाही म्हणता येईल: Ajit Pawar यांनी विरोधकांना सुनावले

“अरे ला का रे, असं मलाही म्हणता येईल, परंतु आम्ही समंजस भूमिका घेतो,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षांना विधानसभेत सुनावले. (Ajit Pawar)

गेल्या आठवड्यात राज्याच्या अर्थसंकल्पावर विधानसभेत दोन दिवस चर्चा झाली. जवळपास ७५ सर्वपक्षीय आमदारांनी या चर्चेत भाग घेतला आणि आपली मते मांडली तसेच काही सूचना केल्या. अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला मंत्री म्हणून उत्तर देताना कॉँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांना खडे बोल सुनावले. पवार म्हणाले की, वडेट्टीवार यांनी त्यांच्या भाषणात स्मारकांवर बोलताना भावनेच्या भरात जिव्हारी लागेल, अशा प्रकारची विधाने केली. “पण काहींनी आपण कुठे बोलतोय, काय बोलतोय, या सभागृहाची परंपरा काय? याचाही ताळमेळ ठेवला नाही.” (Ajit Pawar)

तुमची स्मारके बांधा, असं म्हणालो का?

“विजय वडेट्टीवार यांनी भावनेच्या भरात स्मारके बांधा.. अरे कुणाची स्मारके बांधा, कशाची स्मारके बांधा.. नाहीतर २०२९ मध्ये तुमची स्मारके बांदण्याची तयारी करा. कुणाची स्मारके? आम्हाला एवढ्या मतांनी निवडून दिले म्हणून स्मारके बांधायला निघाला? काय बोलतो आपण? उचलली जीभ लावली टाळ्याला? ही काय पद्धत झाली. एकेकाळी ते मंत्रीमंडळात माझे सहकारी होते. निवडणुकीत जय-पराजय होतो. २०२४ मध्ये लोकसभेला तुमचा दारुण पराभव झाला म्हणून आम्ही तुमच्याविषयी, तुमची स्मारके बांधा, असं म्हणालो का? म्हणण्याचं कारणही नाही. यांना जर अरे म्हणता येत असेल तर मलाही का रे, म्हणता येतं. राज्याची जनता बघत असते,” असे अजित पवार सुनावले. (Ajit Pawar)

ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा

अजित पवार पुढे म्हणाले की, अर्थसंकल्पावर दोन्ही बोजूची मते व्यक्त होतात. काही जण ‘बडा घर पोकळ वासा’ तर काहींनी ‘मारल्या थापा भारी, केला महाराष्ट्र कर्जबाजारी’ अशी टीका केली. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांना उद्देशून पवार म्हणाले, “जयंतराव आपण भाषणात म्हणालात की, यावेळी मी संत तुकारामांचे अभंग घेतले नाहीत. एकनाथांनाही विसरलो. मी आपल्याला सांगू इच्छितो की, तुकाराम आणि एकनाथ यांना मी विसरलो नाही. ही दोन्हीही संत मंडळी माझ्या ह्यदयात आहेत आणि माझ्या अगदी जवळ, माझ्या डाव्याबाजूला, ज्यांना कालच, जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाचा पुरस्कार मिळाला, असे एकनाथ शिंदे आहेत. जयंतराव, तुम्हाला आवडतात म्हणून संत तुकाराम महाराजांच्या दोन ओळी आपल्याला ऐकवतो – ‘ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा’ आमची सेवा करण्याची वृत्ती खरी आहे. त्यामुळे निर्भयपणाने आमची वाटचाल सुरु आहे. वस्तुस्थिती स्विकारुन राज्याला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत,” असे पवार पाटील यांनाही ऐकवले. (Ajit Pawar)

औरोंको, गिराने का, इरादा नहीं रखता

“दादा, कुठे गेला तुमचा वादा? असेही अनेकानी भाषणात विचारले. त्यांना आणि स्मारके बांधण्याची, सन्माननीय व्यक्तींच्या अवमानाची भाषा करणाऱ्यांना मी एवढेच सांगू इच्छितो, ‘जिसे निभा ना सकू, ऐसा वादा नहीं करता, मै बातें, अपने ताकत से ज्यादा, नहीं करता,’ ‘तमन्ना रखता हु, आसमान छु लेने की, लेकीन, औरोंको, गिराने का, इरादा नहीं रखता,” असेही पवार यांनी शायरी केली. (Ajit Pawar)

हेही वाचा-

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.