विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शिवसेनेला ३४ टक्के निधी आणि भाजपला ६६ टक्के निधी दिल्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. त्यालाचा प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना चांगलाच टोला लगावला. यावेळी त्यांनी हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनेचे दिवंगत पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालल्यावर काय परिणाम होतो हे स्पष्ट केले.
विधानसभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजितदादा मला तुमचा स्पष्टवक्तेपणा आवडतो. तुम्ही सांगितले, अर्थसंकल्पात शिवसेनेला ३४ टक्के निधी आणि भाजपला ६६ टक्के निधी. पण सध्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालल्यावर काय परिणाम होतो? पाहा. २०२०-२१च्या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला २ लाख ४८ हजार ३८८ कोटी निधी, काँग्रेसला १ लाख २१ हजार १४ कोटी निधी आणि सगळ्यात मोठा पक्ष असलेला शिवसेना, आता तर आम्ही संख्येने मोठे आहोत, आणि ते संख्येने कमी आहेत. पण तरीही सगळ्यात मोठा पक्ष असलेला शिवसेनेला ६६ हजार कोटी निधी दिला होता. फक्त १५ टक्के दादा, १५ टक्के म्हणजे जेव्हा त्यांचे ५६ होते तेव्हा १५ टक्के निधी आणि आता आमच्यासोबत ४० आहेत, तरीही ३४ टक्के निधी दिला आहे. त्यामुळे अजितदादा रामदास आठवले यांच्या शब्दात सांगायचे तर तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून मारली आम्ही मुसंडी.
(हेही वाचा – ठाकरेंना पुन्हा धक्का; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिवंगत आमदार गोरे कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश)
Join Our WhatsApp Community