अतिवृष्टी या विषयामध्ये विरोधी पक्षांनी संवेदनशील असले पाहिजे. या विषयाचे राजकारण करणे योग्य नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा केली जात आहे. त्यानुसार आम्ही योग्य ती काळजी घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
पंचनामे झाले नसल्याच्या विरोधी पक्षांच्या टीकेसंदर्भात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. तत्काळ पंचनाम्याचे आदेश आपण दिले आहेत. आता त्याची सुरुवात झाली आहे. थोडा काळ तर त्याला लागणार आहे. पण, याव्यक्तिरिक्त आम्ही हे सांगतो आहे, की शेतकऱ्याने नुसता फोटो जरी काढला तरी पंचनामा मंजूर करू. मला तर विरोधी पक्षाचे देखील आश्चर्य वाटते.
कसब्यातील निकालावर चिंतन कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या अहवालासंदर्भात भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, एखादी निवडणूक आपण जिंकतो किंवा हरतो याने फार काही फरक पडत नाही, असे मी मानतो. मात्र, कोणत्याही निवडणुकीच्या विजयानंतर किंवा पराजयानंतर आम्ही त्याचे मूल्यमापन किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचे तर कारणमीमांसा करत असतो.
(हेही वाचा – आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल, नेमक प्रकरण काय?)
Join Our WhatsApp Community