महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितीन देशमुख यांनी मी नेहमी इंग्रजीमध्ये सही करतो. परंतु बंडखोर आमदारांनी केलेल्या ठरावावरची सही मराठीमध्ये आहे. ती सही माझी नसल्याचे, त्यांनी सांगितले त्यामुळे या सहीची सत्यता तपासणार, खात्री करणार असे झिरवळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी दिलेले पत्र स्वीकारले
नरहरी झिरवळ म्हणाले की, कायद्यानुसार गटनेता निवडीचा अधिकार हा पक्षप्रमुखाचा असतो आणि गटनेत्याने प्रतोदाची नेमणूक करायची असते. त्यामुळे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांना गटनेता केल्याचे पत्र दिले असून ते स्वीकारले आहे, असे झिरवळ यांनी सांगितले.
( हेही वाचा: मागच्या अडीच वर्षांत आमदारांना अपमानास्पद वागणूक; बंडखोर आमदाराचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र )
अभ्यास करुन निर्णय घेणार
अजय चौधरी हे गटनेते आहेत. सुनील प्रभूंनी दिलेल्या सहीचे पत्र मी स्वीकरले आहे. दोन तृतीअंश आमदारांचा दावा अद्याप माझ्याकडे आलेला नाही. असा दावा करणे त्यांचा प्रश्न आहे. माझ्याकडे आल्यावर मी घटनेत असेल त्याप्रमाणे अभ्यास करुन निर्णय घेईल. जे सह्यांचे पत्र माझ्याकडे आले आहे त्यात सह्यांचा प्राॅब्लेम आहे. त्यामुळे त्यातही अभ्यास करुन मी निर्णय घेणार असल्याचे झिरवळ म्हणाले.
Join Our WhatsApp Community