शिवसेनेचा विरोध तरी जन आशीर्वाद यात्रा सुरु! चिपळूण, मुंबईत राडा!

राणेंच्या जुहू येथेही बंगल्यावर युवा सैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले, धक्काबुक्की झाली. पोलिसांनी अखेर लाठीचार्ज करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला.

159

नारायण राणे हे त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी, २४ ऑगस्ट रोजी चिपळूण येथे दाखल झाले. मात्र पहाटेच राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक नाशिक येथे रवाना झाल्याचे वृत्त येताच तणावाचे वातावरण निर्माण झाले. राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केले. त्याविरोधात नाशिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी १०.३० वाजपर्यंत राणे याना अटक होणार का, जन यात्रा होणार का, अशी चर्चा सुरु होती. मात्र अखेर राणे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडून थेट यात्रा सुरु केली.

चिपळूणमध्ये शिवसैनिकांचा विरोध!

ही यात्रा सुरु होताच चिपळूण येथेही बहादूर शेख नका येथे मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले आणि त्यांनी यात्रेला विरोध करण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. त्यावेळी शिवसैनिकांनी राणे यांचे पोस्टर फाडले, असेच राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. असे असूनही राणे यांची यात्रा सुरूच राहिली. मोठ्या पोलिस संरक्षणात राणेंची हे जन आशीर्वाद यात्रा सुरु राहिली.

(हेही वाचा : केंद्रीय मंत्री असलेल्या राणेंना अटक होऊ शकते का? काय म्हणतो कायदा?)

जुहू येथे राणे समर्थक आणि युवा सेना कार्यकर्ते भिडले

दुसरीकडे जुहू येथील राणेंच्या बंगल्यावर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात युवा सैनिक उपस्थित होते. मात्र त्याच वेळी त्या ठिकाणी आधीच भाजपचे कार्यकर्ते आणि राणेंचे समर्थक उपस्थित होते. सकाळी ११ वाजता युवा सैनिकांनी जेव्हा राणेंच्या जुहू येथेही बंगल्यावर निघाले तेव्हा मात्र युवा सैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले आणि धक्काबुक्की सुरु झाली. तसेच काही या ठिकाणी दगडफेकही झाली. युवा सेनेची नेते वरून सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी अखेर लाठीचार्ज करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.