प्रतिकात्मक का होईना लोहगडावर उरुस झालाच! दुर्गप्रेमींना दिल्या नोटीस

162

राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे, त्यामुळे राज्य सरकारने दिवसा जमाव बंदी आणि रात्री संचारबंदी लावली आहे. असे असताना पुण्यातील लोहगडावर मात्र उरुसाचे जंगी आयोजन सुरू होते. याला दुर्गप्रेमींनी कडाडून विरोध केला. त्यामुळे अखेर या उरुसावर गडांतर येणार हे निश्चित झाले होते, परंतु यामुळे मुसलमान नाराज होतील, या भीतीने पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांनी स्थानिक ४-५ मुसलमानांना गडावर जावून कबरीवर चादर अंथरण्यास परवानगी दिली. उरुस म्हणजे मुसलमान सत्पुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्या कबरीवर नवे वस्त्र चढवतात, त्यासाठी केली जाणारी यात्रा म्हणजे उरुस होय.

lohgad3
प्रतिकात्मक ऊरुस साजरा केल्यानंतरचे छायाचित्र

दुर्गप्रेमींचा उरुसाला होता विरोध 

लोहगड हा ‘संरक्षित स्मारक’ असून तिथे धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. असे असतांनाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उरुसाचे आयोजन करण्याची तयारी सुरु झाली होती, त्याकरता मोठा मंडप उभारण्यात येत होता. हे लक्षात येताच दुर्गप्रेमींनी त्याला विरोध केला. याविषयी पुरातत्व विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन सजग केले. तसेच हे गडावर होत असलेले इस्लामीकरण रोखण्याची मागणी केली. १७ जानेवारी रोजी हा उरूस होणार होता. हाजी उमरशहावली ट्रस्टकडून या उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. याविषयीही दुर्गप्रेमींनी पोलिस प्रशासन, तसेच पुरातत्व विभाग यांना कळवले होते. दुर्गप्रेमींच्या वाढत्या विरोधामुळे पोलिसांनी त्यांनाच नोटिसा बजावल्या. दुर्गप्रेमींच्या विरोधामुळे लोहगडावर उरुसाचे मोठ्या प्रमाणात आयोजन न करता स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीत १७ जानेवारी या दिवशी हाजी उमरशहावली ट्रस्टच्या ५ सदस्यांनी येथील अवैध दर्ग्यावर चादर चढवली. मात्र यामुळे केंद्राकडून आलेल्या आदेशानुसार मुंबई पुरातत्व विभागाने उरूस साजरा न करण्याविषयी दिलेल्या आदेशाचे पोलिस आणि अवैधरित्या चादर चढवण्यात सहभागी व्यक्ती यांच्याकडून एक प्रकारे उल्लंघनच झाले आहे.

(हेही वाचा लोहगडाचा होतोय श्रीमलंग गड! राज्यात जमावबंदी, संचारबंदी तरी उरुसाची घाई!)

पोलिसांचा दिखाऊपणा 

ऎनकेनप्रकारे लोहगडावर उरुसाच्या दिवशी रनिदान चादर चढवण्याची मुसलमानांची धार्मिक प्रथा होऊ देण्यासाठी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने सोबत लोहगडावरील शिवमंदिरात हिंदूंकडून पूजन करवून घेतले आणि दिखाऊपणा केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.