Rahul Gandhi यांच्या खास माणसाला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पद

123
Rahul Gandhi यांच्या खास माणसाला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पद
  • खास प्रतिनिधी 

गेले काही महिने काँग्रेस (Congress) पक्षाला राज्यात प्रदेशाध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार मिळता मिळत नव्हता. याचे मुख्य कारण म्हणजे पक्षात स्वच्छ प्रतिमा, न्यायालयीन खटला नसलेला आणि संपत्ती सर्वसाधारण असलेल्या नेत्यांची कमतरता. त्यामुळे विधानसभेला सपशेल पराभव होऊनही अखेर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा चमचा म्हणून ओळख असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष पदासाठी झाली.

विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर

१९९९ ते २००२ या काळात सपकाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. सपकाळ हे २०१४-२०१९ दरम्यान बुलढण्याचे आमदार होते. २०१९ मध्ये पुन्हा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली मात्र शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. सपकाळ यांना वंचित बहुजन आघाडी उमेदवार विजय शिंदे यांच्यापेक्षा १०,००० मते कमी मिळाली होती तर शिवसेनेचे गायकवाड यांच्यापेक्षा ३५,००० मते कमी मिळाली होती. सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. (Rahul Gandhi)

(हेही वाचा – Pratap Sarnaik : महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन; परिवहनमंत्र्यांची घोषणा)

निलंबनाची कारवाई

२२ मार्च २०१७ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल आणि विधानसभेबाहेर अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह १८ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानतंर तीन आठवड्यांनी त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले.

मालमत्ता जेमतेम

सपकाळ यांच्या नावावर न्यायालयात एकही खटला दाखल नसून त्यांची मालमत्ता २०१९ च्या रेकॉर्डप्रमाणे सुमारे रुपये ६० लाख रुपये म्हणजे जेमतेम आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा स्वच्छ असल्याचे मत दिल्ली हायकमांडकडे असून राहुल गांधी यांचे आदेश पाळणारे असल्याने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला आहे. (Rahul Gandhi)

प्रदेशाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे (Congress) नेते विजय वडेट्टीवार इच्छुक होते मात्र काँग्रेस (Congress) हायकमांडने वडेट्टीवार यांच्या नावाचा विचार केला नसल्याने ते नाराज आहेत, असे एका काँग्रेस (Congress) नेत्याने सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.