महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘डिटेक्टीव्ह देवेंद्र’; ‘सामना’तून फडणवीस यांच्यावर टीका

138

सामना या वृत्तपत्रातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या रोखठोक या सदरामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोटो एखाद्या गुप्तहेराच्या वेषामध्ये दाखवण्यात आला आहे. रोखठोकमध्ये संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह जे बंड केले त्याच्याशी भाजपचा संबंध नाही, असे सांगणारे भाजपवाले उघडे पडले. शिंदेंनीच पडद्यामागचे सारे कारस्थान विधानसभेत फोडले आणि आता अमृता फडणवीस यांनीही घरातलं गुपित फोडलं. त्यामुळे या सर्व घडामोडींमागे भाजप असल्याचे स्पष्ट झाल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

या सर्व काळात देवेंद्र फडणवीस हे रात्री-अपरात्री वेषांतर करुन शिंदे यांना भेटण्यासाठी बाहेर पडत. काळा कोट, काळा चष्मा, फेल्ट हॅट असे जेम्स बाॅण्ड किंवा शेरलाॅक होम्स पद्धतीचे वेषांतर करुन ते बाहेर पडत असावेत. त्यांच्या तोंडात चिरुट वगैरे आणि हातात नक्षीदार काठी होती काय? याचाही खुलासा व्हायला हवा,असे रोखठोकमध्ये म्हटले आहे.

( हेही वाचा: आमदार संतोष बांगर यांची शिवसेनेतून हकालपट्टी )

अजित पवारही म्हणतात सुत्रधार फडणवीसच

बगदादचा खलिफा हरुन- अल-रशीद अनेकदा वेषांतर करुन त्याच्या राज्यात फिरत असे. पण तो का फिरत असे? आपला राज्यकारभार करताना आपल्याला कोणी फसवत तर नाही ना हे जाणून घेण्यासाठी पण आपले हरुन-अल-रशीद वेषांतर करुन भेटत होते ते बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे कारस्थान तडीस नेण्यासाठी, असे म्हणत फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. फक्त सामनामधूनच नव्हे तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यामागचा सुत्रधार फडणवीसच असल्याचे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.