लोकसभा निवडणुकीसाठी सार्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करू लागले आहेत, ज्याप्रकारे I.N.D.I.A. आघाडी मोर्चेबांधणी करू लागली आहे, त्याप्रमाणे एनडीए (NDA)आघाडीतही छोटे-मोठे पक्ष सहभागी होऊ लागले आहेत. यामध्ये कर्नाटकातील मोठा पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एनडीएमध्ये सहभागी होणार आहे, ज्यामुळे कर्नाटकातील गणित बदलणार, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
भाजप आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) यांच्यातील युतीबाबत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आता संपुष्टात आली आहे. जेडीएस सुप्रिमो आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी 11 सप्टेंबर रोजी सांगितले की, भाजप आणि जेडीएस एकत्र एनडीए )NDA) मधून लोकसभा निवडणूक लढतील. बेंगळुरूमध्ये एका कार्यक्रमात ते म्हणाले, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र निवडणुका लढवण्याचे मान्य केले आहे. जेडीएस किती जागा लढवणार हे पंतप्रधान मोदींशी बोलून ठरवले जाईल. पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी निर्णय घेतल्याचे जेडीएसचे सुप्रीमो देवेगौडा म्हणाले. विरोधी पक्षांच्या युती असलेल्या I.N.D.I.A. बाबत ते म्हणाले, मी एवढा मोठा धर्मनिरपेक्ष नेता आहे, तरीही काँग्रेसने या आघाडीत सहभागी होण्यासाठी माझ्याशी संपर्कही केला नाही.
Join Our WhatsApp Community