एकीकडे महाविकास आघाडीच्या निर्णयांना स्थगिती दिल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव गटाच्या आमदारांची कोंडी झालेली असताना, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीसांनी सर्वपक्षीय आमदारांचे तोंड गोड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी ८० लाख रुपये देण्यात येणार आहेत.
स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी ८० लाख रुपये देण्यात येणार
शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीने घाईघाईने घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगिती देण्यात आली. चार महिन्यांनंतर जिल्हा वार्षिक योजनांवरील स्थगिती उठवली असली, तरी अद्याप त्याचे नियोजन झालेले नाही. तसेच एप्रिल २०२१ नंतर मंजूर केलेल्या निधीवरील स्थगितीही अद्याप कायम आहे. त्यामुळे शिंदे फडणवीसांनी घेतलेला हा निर्णय सर्वपक्षीय आमदारांना दिलासादायक ठरणार आहे. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व आमदारांना स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी ८० लाख रुपये देण्यात येणार आहेत. राज्यातील २८७ विधानसभा सदस्य आणि ६३ विधानपरिषद सदस्यांना आपापल्या मतदारसंघांत विकासकामे करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे.
(हेही वाचा केसरकर म्हणतात, दिवाळी तुळशी विवाहापर्यंत, तोवर आनंदाचा शिधा पोहचेल!)
तिजोरीवर किती भर पडणार?
शासनाच्या या दिवाळी भेटीमुळे राज्याच्या तिजोरीवर १ हजार ४६४ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मात्र एवढ्या मोठ्या निधीचा बोजा एकाचवेळी पडू नये, यासाठी प्रत्येक महिन्याला १० टक्के निधी वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community