ठाणे विभागासाठी कळवा येथे विकसित होणार अद्ययावत बसपोर्ट

96

कळवा येथे राज्य परिवहन (एस. टी.) महामंडळाचे विभागीय कार्यशाळा व विभागीय भांडार आस्थापना कार्यरत आहे. याठिकाणी एसटी महामंडळाच्या बस गाड्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती केली जाते. तसेच विभागीय भांडारामार्फत ठाणे विभागातील सर्व आगारांना दैनंदिन लागणाऱ्या साहित्यांचा पुरवठा केला जातो. येथे कर्मचाऱ्यांसाठी, प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा अपुऱ्या पडत आहे. त्यासाठी एस. टी. महामंडळाच्या उपलब्ध जागेवर कळवा येथे अद्ययावत बसपोर्ट विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, ठाणे महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

( हेही वाचा : 7th pay commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर! सातव्या वेतन आयोगाचा थकीत हप्ता खात्यात जमा झाला का?)

नव्याने आराखडा सादर करावा

कळवा येथे राज्य परिवहन महामंडळाची जागा आहे. येथे बस गाड्या दुरुस्तीसाठी गाळे, भांडार विभाग, वॉशिंग रॅम, वाचनमन केबिन, स्क्रॅपयार्ड, दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्या उभ्या करण्यासाठी जागा, अशा आवश्यक सोयी सुविधांसह नव्याने आराखडा सादर करावा, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले. तसेच ठाणे रेल्वे स्टेशनलगतच्या जागेवर एस.टी. डेपोसह सार्वजनिक पार्किंग, वाणिज्य वापराचे बांधकाम, चालक-वाहक विश्रांतीगृह, आरक्षण व चौकशी कक्ष, प्रवासी उतरण्यासाठी स्वतंत्र सोय, कार्यालय आस्थापनाचा समावेश करुन सुधारित आराखडा तयार करावा. अशा सूचना देऊन ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.