आज म्हणजेच शनिवार ८ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस एकाच मंचावर आले आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करत “राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असेल तर राज्यात विकासाचे काम करणे अधिक गतीने होतात” असे विधान केले आहे. तसेच गडचिरोलीचा विकास व्हावा व नक्षलवाद संपावा, हेच शासनाचे धोरण असल्याचे स्पष्ट केले.
(हेही वाचा – रात्री उशिरा फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; पुन्हा चर्चेला उधाण)
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असेल तर राज्यात विकासाची कामे जलद गतीने होतात. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या महायुतीसोबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झालो आहोत. मंत्र्यांसोबतच आता प्रशासनाचे प्रमुख अधिकारी व सचिवांनीही गडचिरोलीचे दौरे केले पाहीजेत. सर्वसामान्यांर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. तसेच अजित पवार पुढे म्हणाले की, गडचिरोलीतही आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ झाले पाहीजे. जेणेकरून गडचिरोलीत राज्यासह देशातील नेत्यांना येणे सोयीचे होईल. याचबरोबर नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्गदेखील भंडारा, गडचिरोलीपर्यंत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी देखील शासन प्रयत्न करत आहे. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीची जबाबदारी घेतली आहे. ते गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे गडचिरोलीच्या विकासाकडे राज्यातील प्रमुख नेत्यांचे लक्ष आहे. या भागाचा, गडचिरोलीचा विकास व्हावा व नक्षलवाद संपावा, हेच शासनाचे धोरण आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community