‘आरे’साठी लवकरच सर्वंकष विकास आराखडा तयार करणार; महसूलमंत्र्यांचे स्पष्टीकरण

102

गोरेगाव येथील आरे कॉलनीसाठी सर्वंकष विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

( हेही वाचा : नेस्कोच्या कोविड सेंटरच्या भंगारातही ७८ लाखांची कमाई )

विधानसभा सदस्य रवींद्र वायकर, सुनील राणे यांनी आरेच्या पुनर्वसनाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात उत्तर देताना मंत्री विखे- पाटील म्हणाले की, आरे वसाहती अंतर्गत ररत्यांची दुरावस्था झाली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यांचे डांबरीकरण न करता क्रॉक्रिटीकरण करण्यात येईल. आरे हा भाग संवेदनशील क्षेत्राअंतर्गत येत असल्याने या भागाचा विकास करताना पर्यावरण विभागाची परवानगी असणे आवश्यक आहे.

गोरेगाव चेकनाका येथे उभारण्यात येत असलेल्या प्रवेशद्वारास छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र याचा प्रस्ताव का प्रलंबित आहे हे तपासून पाहण्यात येईल. आरे परिसरात अनधिकृत पध्दतीने राहत असल्याने अनधिकृत लोकांना हटविण्यासाठी करावयाच्या उपनयायोजना याबाबत एक समिती तयार करण्यात येईल. आरे येथील तलावांमध्ये गणपती विसर्जित केल्यानंतरचा गाळ बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून काढण्यात आलेला नसल्याने हे काम तातडीने करण्यात येईल असेही विखे- पाटील यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.