Devendra Fadanvis : बाळासाहेब राम मंदिर आंदोलनाच्या भक्कम मागे होते; तेव्हा उद्धव ठाकरे, चेलेचपाटे कुठे होते? देवेंद्र फडणवीसांचा सवाल 

215

बाबरी ढाचा १९९२ मध्ये पाडण्यात आला. त्यानंतर प्रत्येकाला वाटत होते की राम मंदिर झाले पाहिजे. २२ जानेवारीला राम मंदिर होत आहे. आपले सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. मला खरे म्हणजे जे लोक आपल्याला प्रश्न विचारायचे, आपल्याबरोबर असणारे लोक सभेतून विचारायचे मंदिर वहीं बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे.. त्यांच्या छातीवर चढून आपण तारीख सांगितली. २२ जानेवारी २०२४ या दिवशी राम मंदिर होत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वाघ होते. ते आंदोलनाच्या मागे भक्कमपणे उभे होते. पण उद्धव ठाकरे आणि तुमचे चेलेचपाटे त्या आंदोलनात कुठे होतात?, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला.

(हेही वाचा DCM Devendra Fadnavis : मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसायची आहे)

या आंदोलनाशी तुमचा काहीही संबंध नाही. तुम्ही अयोध्येला आला नाहीत, कारसेवेला आला नाहीत. यांचे हिंदुत्व भाषणापुरते आहे. भाषणापलिकडे यांचे हिंदुत्व नाही. ज्या लाखो कारसेवकांनी श्रम केले, ज्यांनी बलिदान दिले त्यातून राम मंदिर उभे होते आहे. नव्या भारताची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. अशा भारताची निर्मिती होते आहे जो जगातले  उत्तम राष्ट्र म्हणून उभा राहणार आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

आज मुंबईतले जे परिवर्तन आहे ते आपल्या कार्यकाळात झालेले परिवर्तन आहे. मोदींच्या आशीर्वादामुळे झालेले परिवर्तन आहे. याचे सर्वात मोठे प्रतीक म्हणजे अटल सेतू. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सेतूचे उद्घाटन केले जात आहे. आता यांचा उघडा पडला आहे. वर्षानुवर्षे यांचे राजकारण काय होते? कुठलाही प्रकल्प करायचा नाही आणि प्रकल्प होणार असेल तर विरोध करायचा. मागे वळून पाहिल्यानंतर एक तरी प्रकल्प तुमच्या नावाने दिसेल का? हा माझा उद्धव ठाकरे यांना सवाल आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.