फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रात आणण्यासाठी फडणवीस सरकारने प्रयत्न केल्याची काँग्रेसची कबुली

फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रात न येण्यामागे शिवसेना कारणीभूत असल्याचे अधोरेखित

फॉक्सकोन कंपनी शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात गुजरातला गेल्याचा आरोप विशेष करून शिवसेना तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी करत आहे. त्याच वेळी फडणवीस सरकारच्या काळात २०१६ मध्ये फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न केले, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जुलै २०२० मध्ये पत्र लिहिले त्यामध्ये त्यांनी फॉक्सकॉन कंपनीसाठी फडणवीस सरकारचे प्रयत्नही अधोरेखित केले.

काय म्हटले होते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रात?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तैवानी घटक निर्माता पेगाट्रॉनला राज्यात उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी प्रयत्न वाढवण्याची विनंती त्यांच्या पत्राद्वारे केली होती. पेगाट्रॉन कंपनी जी Apple ची दुसरी सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे, ती भारतात येऊ पहात आहे, चीनच्या बाहेर उत्पादन क्षमता वाढवण्याचा पर्याय म्हणून भारताकडे ही कंपनी पाहत आहे आणि iPhones साठी एक प्लांट भारतात स्थापन करू इच्छित आहे. राज्यात एकही मोठ्या मोबाइल कंपनीचा उत्पादक कारखाना नाही, त्यामुळे ठाकरे सरकारने या संधीकडे गांभीर्याने पहावे, अशी सूचना चव्हाण यांनी केली. त्याचवेळी त्यांनी फडणवीस सरकारने फॉक्सकॉन कंपनी पुण्यात 35,000 कोटी रुपयांचा प्लांट उभारेल, असे घोषित केले होते, परंतु त्यांनी अखेर तामिळनाडूमध्ये गुंतवणूक केली, असे पत्रात नमूद करत तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्योग खाते शिवसेनेकडे होते, याची आठवण करून दिली आणि शिवसेनेचे अपयश दाखवून दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here