अर्थसंकल्पात राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी! फडणवीसांनी काय केला भांडाफोड? 

153
राज्याच्या अर्थसंकल्पात निधी वाटपामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी डंके की चोट पर मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांना सर्वाधिक निधी दिला आहे, तर शिवसेना आणि एनसीपीची बोळवण केली आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भांडाफोड केला.

अर्थसंकल्पातील ५७ टक्के निधी राष्ट्रवादीने स्वतःकडे घेतला

राज्याच्या अर्थसंकल्पवरील चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर घणाघाती हल्ला केला. ज्याची ताकद आहे त्याला मदत आहे, ज्याची कमी ताकद तो उपाशी, अशी आहे अर्थसंकल्पाची स्थिती. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आहेत म्हणून मुंबई शहराच्या निधीत १३० टक्के वाढ आहे, तर गडचिरोलीसाठी १७ टक्के वाढ आहे. राज्याचा अर्थसंकलप ५ लाख ४८ हजार कोटींचा आहे. त्यातील एनसीपीकडे असलेल्या खात्यांना ३ लाख १७ हजार कोटी देण्यात आले, काँग्रेसच्या खात्यांना १ लाख ४४ हजार कोटी आणि शिवसेनेच्या खात्यांना ९० हजार १८१ कोटी देण्यात आले आहेत, जिथे पगार जास्त द्यावा लागतो ती खाती राष्ट्रवादीकडे नाही तर काँग्रेसकडे आहेत, तरीही सर्वाधिक निधी मात्र राष्ट्रवादीकडे आहेत. अजित पवारांनी मागच्या वर्षीही तेच केले होते. अर्थसंकल्पातील ५७ टक्के निधी राष्ट्रवादीने स्वतःकडे घेतला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.