उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

147

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाख घेतली, त्याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी फिक्स मॅच बघत नाही, लाईव्ह मॅच बघत असतो. त्यावर प्रतिक्रियाही देत नाही लाईव्ह मॅच बघण्यातच मजा असते. यावर पुन्हा कधीतरी मी प्रतिक्रिया देईन.’

मविआ सरकारने अखेरच्या काळात ४० जीआर काढले 

मविआ सरकार कोसळण्याच्या प्रसंगी सरकारने ४०० जीआर काढले आहेत. जेवढा पैसा नाही त्याच्या ५ टक्के अधिक पैसा वाटला आहे. माविआ सरकारने घेतलेले निर्णय असेच चालू ठेवले तर सरकारचा बट्ट्याबोळ होईल, तसे होऊ नये यासाठी त्या सरकारच्या निर्णयाचे पुनर्परीक्षण करत आहोत. त्यासाठी आदित्य ठाकरेंचे खाते किंवा अन्य कुणाचे खाते असा भेद करत नाही, सर्वच खात्याचे पुनर्परीक्षण सुरु आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा शिवसेना, धनुष्यबाणावरील दाव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात १ ऑगस्टला फैसला)

काँग्रेसचे आंदोलन दिखाऊपणा 

सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेसचे आंदोलन त्यांच्या नेत्यांना दाखवण्यासाठी होत आहे, प्रत्येक जण आपला फोटो कसा दिसेल यासाठी प्रयत्न करत आहे. आम्हीही तुमच्यासाठी काही तरी करत आहे, त्यामुळे भविष्यात आम्हा काहीतरी द्या  हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अतिवृष्टीवर चांगला निर्णय घेऊ 

अतिवृष्टीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे, पुन्हा बैठक घेणार आहोत. एकदम निर्णय घ्यायचा असतो, सर्व जिल्ह्यांचे अहवाल येत आहेत, अजित पवार यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयापेक्षा आधी चांगला निर्णय घेऊ, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.