फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, आधी संजय राऊतांना अक्कल शिकवा! 

104

तुमच्या घरगडींना ईडी बोलावतेय म्हणून ईडीला घरगडी म्हणता का? पोलिसांकडून आमच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करतायेत. मग आम्ही पोलिसांना घरगडी म्हणायचे का? हे कुणीच घोषित करू नये उद्या कोण आणि परवा कोण? मग ही अक्कल संजय राऊतांनाही देणार का?, अशी खरमरीत टीका करत फडणवीस यांनी आम्ही या सरकारचा निषेध म्हणून सभात्याग करतो, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुनावले.

शिवाजी पार्कातील भाषण विधिमंडळात 

तुम्ही म्हणता आमच्यावर टीका करा, महाराष्ट्रावर नको. महाराष्ट्रावर टीका कोण करते? तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही. हा संभ्रम मनातून काढून टाका. जे मुद्दे आम्ही मांडले त्याला एकही उत्तर दिले नाही. आम्ही जे आरोप मांडले ते पुराव्यासकट मांडले आहेत. त्यावर उत्तर नसल्याने असे भाषण दिले. तुमचा त्रास आमच्या लक्षात येतो आहे. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले नाही. हे भाषण विधानसभेतील होते. पण शिवाजी पार्कचे भाषण झाले,

(हेही वाचा संपकरी एसटी कामगारांना परिवहन मंत्र्यांनी काय दिले आश्वासन?)

तेव्हा सत्तेला लाथ मारली 

तसेच मेहबुबा मुफ्तीसोबत गेल्याचे उद्धव ठाकरे म्हणतात. अफजल गुरूला फाशी देऊ नका असे पत्र देणारे आज तुमच्यासोबत बसले आहेत. मेहबुबा मुफ्तीसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, आयएसएने सांगितले होते काश्मिरात निवडणुका होऊ देणार नाही. तेव्हा ६० टक्के मतदानासह निवडणुका घेऊन दाखवल्या. ज्यावेळेस फुटिरतावाद्यांनी निवडणुका झाल्या तरी सरकार बनू देणार नाही, असे आव्हान दिले. तेव्हा देशाची आवश्यकता होती म्हणून भाजपा मेहबुबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये गेली. परंतु आम्ही तेव्हा निवडणुका होऊ शकतात हे दाखवून दिले तेव्हा दुसऱ्या क्षणाला सत्तेला लाथ मारली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.