मुंबईतील कोविड घोटाळ्याचा फडणवीसांकडून पर्दाफाश

120

कोरोना काळात कोविड सेंटरचे काम कुणाकुणाला दिली गेली, याचे धक्कादायक खुलासे करत कोविड केअर सेंटरला चांगली नावे देऊन किंवा प्रतिष्ठीत कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली नावे देऊन काम देण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. इतकेच काय तर पाच कोविड सेंटरच्या 100 कोटींची कंत्राटे ही पदाधिकाऱ्यांच्याच नातेवाईकांना देण्यात आली असल्याचा हल्लाबोल फडणीसांनी केला.

ज्या कंत्राटदाराला पुण्यात हाकलले त्याला मुंबईत कंत्राटे

अनुभव नसलेल्या लोकांना काम द्यायचे. त्या ठिकाणी रुग्ण आला की नाही, त्याला 50 टक्के रक्कम दिली गेली. कारण आपल्याच कुणाला तरी कोविड सेंटर देण्यात आली होती. अजित पवार यांनी पुण्यातून ज्या कोविड सेंटरच्या कंत्राटदाराला 15 दिवसांत हाकलले. त्यांनाच मुंबईत 5 कोविड सेंटरचे कंत्राट देण्यात आले. पण त्यावर कुठली कारवाई होताना दिसत नाही, असेही फडणवीस म्हणाले. मुंबईतीतल मुलुंड कोविड सेंटरचे काम घाईघडबडीत देण्यात आल्याचेही फडणवीसांनी म्हटले आहे. आपल्याच एकाच्या आशा कॅन्सर ट्रस्टला ही कामे देण्यात आल्याचेही फडणवीसांनी यावेळी नमूद केले आहे. या सगळ्यांची कुठे नोंदच नसल्याचाही सनसनाटी आरोपही फडणवीसांनी केला आहे. महिन्याभरातच त्यांची पोलखोल झाली आणि महिन्यात त्यांचे कंत्राट रद्द झाले, असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

(हेही वाचा मविआ म्हणजे महाविनाश आघाडी! देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल)

मुंबईचा शत्रू कोण आहे, हे लक्षात आले

कोविड कंत्राट देण्यावरुन झालेल्या घोटाळ्यावरुन त्यांना शिवसेनेवर थेट निशाणा साधला. मुंबई मेली तरी चालेल, पण आपले घर भरणे मात्र जोरात सुरु आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी टीका केली. ‘आम्ही बोललो, तर आम्ही मुंबई, महाराष्ट्र, मराठी माणसाचे शत्रू’, असे हिणवले जात असल्याचा आरोप त्यांनी विधानसभेत बोलताना केला आहे. दरम्यान आता मात्र प्रत्येकाला मुंबईचा शत्रू कोण आहे, हे लक्षात आले आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीकेची तोफ डागली आहे. कोण प्रेताच्या टाळूवरचे लोणी खात आहे? हे आता सगळ्यांना कळले आहे, असेही फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.