Devendra Fadanvis : शिवसेना, राष्ट्रवादी फोडणे म्हणजे कुटनीती – देवेंद्र फडणवीस

172

लोक मला म्हणत आहे की, फडणवीसांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. एवढेच काय आपल्या म्हणजेच भाजप पदाधिकाऱ्यांच्या मनात देखील प्रश्न पडला आहे की, आपण हे काय करत आहोत. तुमच्या मनात असंख्य प्रश्न असणार. पण चिंता करू नका, अशावेळी संयम आणि विश्वास या दोन गोष्टींची शिंदोरी आपल्याजवळ ठेवा. शिवसेना व राष्ट्रवादी फोडणे म्हणजे कुटनीतीचा भाग आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबईत आयोजित भाजपचे ‘मिशन-2024’ या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी रामायण-महाभारतातले दाखले देत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ज्यांनी 2019 मध्ये जनादेशाचा अनादर केला. अशावेळी अमित शहा यांनी सांगितले की, देवेंद्र आपल्याला अपमान सहन करावा लागेल. पण बेईमानी सहन करायची नाही. ते म्हणाले, असंख्य कार्यकर्त्यांच्या त्यागाची बेईमानी झालेली ती विसरता कामा नये. संयमाने व विश्वासाने काम करत रहा, अशा सूचना दिल्या. आपण त्या दिशेने काम करत आहोत, असे फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा Devendra Fadanvis : फडणवीसांनी सांगितला २०१९मधील घटनाक्रम; म्हणाले उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीची घेतली खोटी शपथ)

कवच कुंडल काढल्याशिवाय पर्याय नव्हता

ज्याप्रमाणे महाभारतात श्रीकृष्णाने कर्णाला हरविण्यासाठी त्याचे कवचकुंडल काढण्याची रणनीती आखली. दुर्योधनाला संपविण्यासाठी त्याला नग्न अवस्थेत पाठविण्याची योजना आखली, भीष्म पितामहाला मारण्याची श्रीखंडीला पाठविले. कारण अनितीला संपविण्यासाठी, बेईमानीचा नाश करण्यासाठी कुटनीती देखील धर्म मानले. अगदी त्याचप्रमाणे ज्यांनी बेईमानी केली. त्यांना धडा शिकविण्यासाठी राजकारणात कुटनीती वापरली जाते. त्याना राष्ट्रवादी, शिवसेनेला फोडणे म्हणजेच एक प्रकारे राजकारणातील कुटनीती आहे. अर्थात कवच कुंडल काढल्याशिवाय संबंधितांना आपल्याला परास्त करता येणार नाही, हे तितकेच सत्य आहे, असे प्रतिपादन फडणवीसांनी करत विरोधकांना जोरदार झोडपले. फडणवीस म्हणाले, मुळात याची सर्वात आधी सुरूवात कोणी केली, याचा विचार त्यांनी करावा. आज काल काही लोक नीतीच्या गोष्टी करत आहेत. कोणी म्हणते दोन दोन पक्ष फोडले, घर फोडले, पण याची सुरूवात त्याच लोकांनी केली आहे. जनादेशाची हत्या देखील त्यांनीच केली आहे.

पवार, शिंदे लहान नेते आहेत का?

शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली असा आरोप केला जातो. पण अजित पवार, एकनाथ शिंदे हे लहान नेते आहेत का, ते काल परवा थोडी राजकारणात आले? मी म्हटलो आणि ते आपल्यात सहभागी झाले. अजिबात नाही. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. गेले चाळीस वर्षांपासून ते राजकारणात आहेत. ते विचारपूर्वक आपल्यासोबत आले आहेत. ज्या ज्या वेळी अन्याय होईल, त्या त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येईल, हे देखील तितकेच सत्य आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.