Devendra Fadanvis : कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा देण्यावर काय म्हणाले फडणवीस?

छत्रपतींच्या राजघराण्यातून अनेकांनी निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये अशा स्वरूपाने निवडणुकीच्या मैदानात त्यांचे घराणे उतरणे हे काही नवीन नाही, असे फडणवीस म्हणाले.

656
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने एकमुखाने पाठिंबा देत छत्रपती शाहू महाराजांची काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी जाहीर केली, मात्र त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पाठिंबा देण्यासंबंधी चा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीलाच एक प्रतिप्रश्न करून पेचात पकडले.
कोल्हापुरातून जर शाहू महाराजांना महायुतीने पाठिंबा देऊन त्यांची बिनविरोध निवड केली, तर महाविकास आघाडी सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवार उभा न करता त्यांना बिनविरोध निवडून देणार का?, असा सवाल फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला. उदयनराजे यांच्या उमेदवारी बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह योग्य तो निर्णय घेतील अशी पुस्तीही त्यांनी जोडली. छत्रपतींच्या राजघराण्यातून अनेकांनी निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये अशा स्वरूपाने निवडणुकीच्या मैदानात त्यांचे घराणे उतरणे हे काही नवीन नाही, असे फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.