ठाण्यातील एक शहाणा म्हणत होता की राम काय खात होते, त्यावर मी एवढेच सांगतो की राम काहीही खाऊ द्या, पण तुम्ही मात्र शेण खाल्ल आहे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम हा बहुजनांचा होता, तो मांसाहारी होता असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी आव्हाडांना टोला लगावला. बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा फडणवीस किती वर्षांचे होते, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावर बोलताना फडणवीस यांनी, मी सुद्धा कारसेवक होतो, कारसेवक हीच माझी पहिली ओळख आहे. काल त्यांनी विचारले फडणवीस कारसेवक होते का? हो मी वीस वर्षाचा होतो, त्यावेळी कारसेवक होतो. तुमचे तर वय होते, त्यावेळी तुम्ही वाघाचे फोटो काढत होता. खरे कारसेवक तर अयोध्येत लाठ्या खात होते, गोळ्या खात होते. उद्धव ठाकरे तुमचा एक नेता दाखवा, जो अयोध्येत कारसेवक होता. ज्या लोकांनी राम मंदिराला विरोध केला त्यांच्या मांडीला मंडी लावून बसला, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
अयोध्येत राम मंदिर होत आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 22 जानेवारी रोजी असा उत्सव साजरा करा की दुनियेला समजले पाहिजे अयोध्येचा राजा अयोध्येमध्ये पुन्हा विराजमान झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापना केली. त्यामुळे पुन्हा एकदा स्वाभिमान निर्माण झाला. राम मंदीर होत आहे ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. बाबराने आपले राम मंदिर पाडले आणि बाबरी मशिद बांधली. सगळ्या लोकांना ही मशिद टोचत होती. 6 डिसेंबर रोजी ही बाबरी मशिद पाडली. मला आता आनंद होत आहे, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भव्य राम मंदिर 22 जानेवारी स्थापना होणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Join Our WhatsApp Community