केंद्रीय गृहमंत्र्याच्या आदेशानुसार देशातील पीएफआय संघटनेवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तरीही राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दसरा मेळावा, धम्मचक्र प्रवर्तन दिन होतो. यावेळी पीएफआय विघ्न आणण्याची शक्यता आहे, अशा शब्दांत ट्विट करून फडणवीस यांनी पोलीस सतर्क आहेत, असाही म्हटले आहे.
पीएफआय आणि तिच्या समविचारी संघटना यांच्यावर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत (यूएपीए) बंदी घातली आहे. यात रिहॅब इंडिया फाउंडेशन, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स कौन्सिल, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्यूमन राइट्स ऑर्गनायजेशन, नॅशनल वुमेन्स फ्रंट, ज्युनिअर फ्रंट, इम्पॉवर इंडिया फाउंडेशन आणि रिहॅब फाउंडेशन, केरळ या संघटनांचा समावेश आहे.
(हेही वाचा ‘काश्मीर फाईल्स’नंतर आता गांधी फाईल्स… गांधी हत्येमागील सत्य उलगडणार?)
काय केले फडणवीसांनी ट्विट?
राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पीएफआयवर भाष्य केले आहे. राज्यातील गृह विभाग अलर्ट आहे. राज्यातील दसरा व नागपूर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात पीएफआयच्या संबंधित संघटना विघ्न आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र जनतेने घाबरून न जाता सजग रहावे. तसेच आयोजकांनीसुद्धा याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Join Our WhatsApp Communityराज्यात दसरा मेळावा, धम्मचक्र प्रवर्तन दिन असे अनेक महत्त्वाचे कार्यक्रम होत असतात. पीएफआयच्या माध्यमातून काही प्रकार होत असतील, तर त्यावर गृहविभागाचे लक्ष आहे. योग्य ती खबरदारी आम्ही घेत आहोत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) October 3, 2022