Devendra Fadanvis : उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज ; देवेंद्र फडणवीस यांची जहरी टीका  

152
Lok Sabha Election 2024: मुंबईसह राज्यात संथगतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी, फडणवीसांनी घेतली गंभीर दखल
Lok Sabha Election 2024: मुंबईसह राज्यात संथगतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी, फडणवीसांनी घेतली गंभीर दखल

देशभरात लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, सध्या चौथ्या टप्प्यातील जाहीर सभांचा जोर वाढू लागला आहे. अशातच उबाठा (UBT) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknaath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर केलेल्या टीकेवर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंचा तोल गेलेला आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे. त्यांनी चांगल्या मानसोपचारतज्ज्ञांना (Psychiatrists) दाखवावं, अशी जहरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, सध्याच्या राजकारणाचे उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. सध्या त्यांच्यावर फार काही बोलणे योग्य ठरणार नाही. त्यांची स्थिती सर्वांनी समजून घेतली पाहिजे. असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला. 

(हेही वाचा – Amol Kirtikar यांच्या प्रचारात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा सहभाग)

उद्धव ठाकरे यांचे गाईड शरद पवार

देवेंद्र फडणवीस हे आज संभाजीनगर (Sambhajinagar) येथे बोलत होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी पिंपरी-चिंचडव (Pimpari-Chichwad) येथील सभेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आले. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. अजित पवार उद्धव ठाकरें यांना किती ओळखतात ते माहीत नाही. पण मी त्यांना चांगलेच ओळखतो. तसेच उद्धव ठाकरे यांचे गाईड शरद पवार आहेत. त्यामुळे पावर जे बोलतील तेच ठाकरे करतील. असेही फडणवीस म्हणाले. 

(हेही वाचा – Water Cut : येत्या शनिवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद)

मानसिक संतुलन बिघडलेले

‘ज्या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो. तेव्हा त्यांना हे लक्षात येतं की, जनतेने त्यांना नाकारलं आहे आणि म्हणून ते शिवीगाळ करण्यावर उतरले आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्यामुळं त्यांनी वैद्यकीय मदत घ्यावी’, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.