मी फडतूस नाही काडतूस, झुकेगा नही तो घुसेगा; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

119

राहुल गांधी वीर सावरकरांचा अपमान करतात आणि उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. उद्धव, काय होतास तू, काय झालास तू, असा कसा वाया गेलास तू? उद्धव मला फडतूस गृहमंत्री म्हणतात, मात्र मी फडतूस नाही काडतुस आहे. झुकेगा नही तो घुसेगा, या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

वीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. सुधांधु त्रिवेदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का प्रामुख्याने उपस्थित होत्या. जर वीर सावरकर यांनी त्याग केला नाही असे म्हटले जात असतील, तर कुणीच त्याग केला नाही असे म्हणावे लागेल, असे गडकरी म्हणाले. तर खुद्द महात्मा गांधी यांनी वीर सावरकर यांना प्रखर देशभक्त व साहसी म्हटले होते. जे महात्मा गांधी यांना कळले ते आताच्या राहुल गांधी यांना कळाले नाही असे  खा. सुधांधु त्रिवेदी म्हणाले. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांचा अपमान केला म्हणून वीर सावरकर गौरव यात्रा काढण्याची संधी मिळाली,  घराघरांत वीर सावरकर पोहचत आहेत. त्यासाठी राहुल गांधी यांचे आभार. असेच काम त्यांनी करावे. मरता क्या न करता, अंधेरी रात मे दिया तेरे हात में असे राहुल गांधी यांचे झाले आहे. ‘डुबाओ रे पार्टी’ ही मोहीम सुरू रहावी, असेही गडकरी म्हणाले.

(हेही वाचा इंग्रज म्हणायचे, ‘वीर सावरकर डेंजर…’ देवेंद्र फडणवीसांनी सांगितला किस्सा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.