वंदना बर्वे
महाराष्ट्रात भाजपच्या मिशन-४५ ला लाभदायक ठरतील अशाच खासदाराची केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शाह यांची काल मध्य रात्री भेट घेतल्यानंतर सुत्राकडून ही माहिती प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा अचानक दिल्ली दौरा केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला असून केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांना स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्ती निमित्त राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या वाट्याला एक कॅबिनेट अनेक राज्यमंत्री पद येण्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, शिंदे गटातील कोणाला मंत्री करायचे, याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात असल्याचे समजते.
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. या संदर्भात अनेक खासदार आणि आमदारांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर मध्ये होते. पंढरपूर येथे सर्व विधी आणि पूजा संपवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी थेट दिल्ली गाठली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रात्री उशिरा भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार या नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. जुलै महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतचा निर्णय घेतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे अखेर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लवकरच निश्चित होणार असल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र ठरल्याची माहिती आहे.
(हेही वाचा – Nagpur Crime : प्रेमाच्या त्रिकोणातून वाद; दिवसाढवळ्या तरुणाची हत्या)
बैठकीबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठीच काल दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. याशिवाय आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. जुलैमध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू. दरम्यान, भाजपश्रेष्ठी शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तार करताना या मंत्र्यांची हकालपट्टी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात लोकसभा निवडणूक आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी मंत्रिमंडळ विस्तार महत्वाचा मानला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला स्थान मिळाल्याने शिंदे गटातील नेत्यांमधील असलेली अस्वस्थता कमी होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community