एसआरए योजनेतील लाभार्थ्याच्या पश्चात त्याचे घर मुलगा, मुलगी, पत्नी किंवा रक्ताच्या नात्यामधील व्यक्तीच्या नावावर करण्यासाठी भरमसाठ शुल्क आकारले जायचे. शिवाय ही प्रक्रियाही वेळकाढू होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला चाप लावला असून, यापुढे एसआरएचे घर २५० रुपयांत होणार नावावर होणार असल्याची माहिती त्यांनी विधानपरिषद सभागृहात दिली.
फडणवीस म्हणाले, एसआरएची सदनिका मुलगा, मुलगी, पत्नी किंवा रक्ताच्या नात्यामधील व्यक्तीच्या नावावर करण्यासाठी यापुढे केवळ २०० रुपये शुल्क आणि ५० हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. तसेच सदनिका विक्रीचा कालावधी १० वर्षांवरून आता ७ वर्षे करण्यात येणार आहे.
एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत सुधारणा करणारे विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, येत्या काळात झोपडपट्टी पुनर्वसनासाठी एक खिडकी योजना तयार केली जाईल. मुंबईतील बहुतांश झोपड्या सरकारी जमिनीवर आहेत. तेथेही एसआरए प्रकल्प राबविले जाणार आहेत. खासगी जागेवरील जुन्या चाळींच्या पहिली मजल्यावरील घरे अधिकृत केली जातील. त्यांना पुनर्वसन सदनिकांचा लाभ देण्यात येईल.
(हेही वाचा – Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती, तब्बल 378 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले)
रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार
रखडलेले एसआरए प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निविदा पद्धतीने विकासकाची निवड करण्यात येत असून यासाठी आर्थिक परिस्थितीनुसार विकासकांची वर्गवारी करण्यात येत आहे. ५१७ प्रकल्पांपैकी ३०० प्रकल्पांसाठी याची कार्यवाही सुरू झाली आहे. विकासकांकडे पैसे नसल्यामुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. ते प्रकल्प एसआरए मार्गी लावेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community