काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये शनिवारी, १० जूनला केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सभा झाली. ‘मोदी @9’ या जनसंपर्क अभियानातंर्गत अमित शहा यांची ही सभा झाली. निवडून येण्याची खात्री नसल्यामुळे अमित शहा सभा घेतायत अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली होती. याच टीकेचे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेतून देत अशोक चव्हाणांना चांगलाच टोला लगावला.
(हेही वाचा – शिवसेना उबाठाच्या दबावात भाई जगताप यांची उचलबांगडी?; मुंबई काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा)
फडणवीस नेमके काय म्हणाले?
नांदेडमधील सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाणांच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले की, ‘अमित भाई यांची नांदेडला आम्ही सभा ठेवली, तर अशोक चव्हाण असे म्हणाले की, त्यांना निवडून येण्याची खात्री नाही म्हणून सभा घेतायत. असं नाहीये अशोक राव. नऊ वर्षात केलेलं सांगण्यासारखं काम आमच्याकडे आहे, म्हणून आम्ही सभा घेतोय. अशोक राव तुमची मजल २जी, ३ जी आणि सोनियाजी यांच्या पलीकडे गेलीच नाही. तुमच्याकडे सांगण्यासारखं काही उरलंच नाही. त्यामुळे तुम्ही सभा घेण्याची हिंमत करत नाही. आम्ही बघा, अमित भाईंची सभा घेतली, जिथंपर्यंत नजर जातेय तिथंपर्यंत लोकंच लोकं दिसतायत. जनतेचा महासागर या ठिकाणी पाहायला मिळतोय.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community